दिल्ली NCR

…..” भिसेगाव प्रभागात सटू आई नगरात दरड कोसळल्याने घरांचे नुकसान “……

नगराध्यक्षा " सौ. पुष्पाताई दगडे व नगरसेवकांनी " केली पाहणी !

सुदैवाने ” जीवितहानी ” टळली…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

अतिवृष्टी मुळे कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील सटू आई परिसरात डोंगर भागाच्या खाली असलेल्या घरांवर काल मुसळधार पावसामुळे दरड कोसळून काही घरांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कर्जत नगरपरिषदेच्या कार्यतत्पर नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

           यावेळी तहसीलदार धनंजय जाधव , कर्जत नगरपरिषद नगराध्यक्षा सौ पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे यांच्या सहित नगरसेवक अशोक दादा राऊत, नगरसेविका सौ. मानसी कानिटकर , बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सौ. हर्षाली उमेश गायकवाड तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.

         नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे व उपस्थित नगरसेविकांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला तसेच नगरपरिषदेच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असा शब्द देत , नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासना मार्फत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!