…..” ग्रेटर नोएडा येथे इनोव्हेटिव्ह ग्रुप ऑफ कॉलेजेसमध्ये दहा दिवसीय गणेश पूजेची हवनाने भव्य सांगता “……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
इनोव्हेटिव्ह ग्रुप ऑफ कॉलेजेस, ग्रेटर नोएडा येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सव गणेश पूजा आणि धार्मिक अनुष्ठानाची आज विधिवत हवन-पूजनाने सांगता झाली. दहा दिवस परिसरात श्री गणेशाची श्रद्धापूर्वक पूजा-अर्चना करण्यात आली, ज्यात विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला.

सांगता समारंभाच्या वेळी विधिवत हवनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ. के. आर. शर्मा आणि सचिव श्री. देवाशीष गौड हे सपत्नीक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. तितिक्षा शर्मा यांनी देखील पूजा-अर्चना केली.
हवनात सर्व भाविकांनी आहुती देऊन श्री गणेशाकडे सुख, शांती, समृद्धी, विश्वकल्याण आणि संस्थेच्या निरंतर प्रगतीसाठी प्रार्थना केली. हवनानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी विधी विभागाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय पांडे म्हणाले की, विश्वशांती आणि विश्वकल्याणासाठी असे धार्मिक अनुष्ठान आवश्यक आहे.
रजिस्ट्रार श्री. अंजनी कुमार जी म्हणाले की, सर्व शिक्षण संस्थांनी शिक्षणा सोबतच संस्कारही दिले पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, असे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा, संस्कार आणि सामाजिक सलोख्याशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
या गणेशोत्सवात दहा दिवस संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण होते आणि हवनाने कार्यक्रमाची शांततेत आणि श्रद्धापूर्वक सांगता झाली.




