Uncategorized

……” संविधान बंगल्याच्या गृह प्रवेशा निमित्ताने आर पी आय कर्जत तालुका महिला अध्यक्षा सौ. सुरेखा कांबळे या आठवले साहेबांच्या भेटीला “……

" नेता असावा तर असा "..... समाजासाठी जोडलेली नाळ....माझा समाज माझा धम्म बांधव व भगिनी !

” रामदासजी आठवले साहेब व सीमा ताई ” यांच्या आदरतिथ्याने आर पी आय कर्जत महिला कमिटी भारावल्या…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

केंद्रामध्ये मंत्रिपदावर असताना देखील समाजासाठी ” नाळ ” जोडलेली असलेला सर्वसामान्य बहुजन समाजाचा नेता , माझा समाज माझा धम्म बांधव , माझी धम्म-भगिनी , त्यांच्यासाठी मला काय करता येईल , असा उदात्त हेतू मनी बाळगून आपल्या भेटीला काही कामानिमित आलेल्या लांबच लांब रांगा असताना फक्त आपल्या ” साहेबांची ” भेट व्हावी म्हणून आलेल्या आर पी आय कर्जत तालुका महिला पदाधिकाऱ्यांची पहिले त्यांना बोलावून भेट घेऊन ” आदरातिथ्य ” देणारे ” रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या ” भेटीने आर पी आय कर्जत तालुका महिला अध्यक्षा सौ. सुरेखा कांबळे व इतर महिला आघाडी कार्यकर्त्या ” भारावून ” गेल्या .

            आर पी आय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या मुंबई येथील ” संविधान ” या नवीन वास्तूचे गृहप्रवेश कार्यक्रम नुकताच मुंबई येथे पार पडला . या अविस्मरणीय संविधान बंगल्याच्या गृह प्रवेशाच्या दिवशी कार्यक्रमास कर्जत तालुका महिला अध्यक्षा सौ. सुरेखा कांबळे व महिला पदाधिकाऱ्यांना जाता आले नाही , म्हणून आज आर पी आय कर्जत तालुक्यातील महिला आघाडीने जाऊन साहेबांची आणि सीमा ताई आठवले यांची शाल व पुष्पगुच्छ देवून भेट घेतली व शुभेच्छा देण्यात आल्या .

           याप्रसंगी आर पी आय कर्जत तालुका महिला अध्यक्षा सौ. सुरेखाताई कांबळे , सौ वंदना गायकवाड – संघटक तालुका कर्जत , सौ रसिका साळवी – उपाध्यक्ष नेरळ शहर , सौ सुनंदा पवार – संघटक नेरळ शहर , श्रीमती सुमन चव्हाण – संघटक नेरळ शहर , श्री सुभाष पवार – उपाध्यक्ष नेरळ शहर , आदी पदाधिकारी उपस्थित होते .

        साहेबांच्या भेटीसाठी रोजच रांगाच्या रांगा ऑफिसच्या बाहेर लागलेल्या असतात , पण त्यातूनही जेव्हा आमची भेट झाली आणि आमचे भेटीच कारण समजलं तेव्हा साहेबांनी आणि सीमाताईंनी केलेलं ” आदरातिथ्य ” त्यामुळे आम्ही भारावून गेलो . म्हणूनच नेता असावा तर असा , सर्वसामान्यांना समान वागणूक देणारे , सर्वांना सोबत घेऊन चालणारे , बहुजनांचे नेतृत्व म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब आहेत , माझ्या आयुष्यातील साहेबांची झालेली हि अविस्मरणीय भेट व आदरतिथ्य कायमस्वरूपी लक्षात राहील , त्यांच्या या भेटीने पक्षात काम करण्यास ऊर्जा निर्माण झाल्याचे , भावनिक मत आर पी आय कर्जत तालुका महिला अध्यक्षा सौ. सुरेखा कांबळे यांनी व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!