……” कर्जत तालुक्यात कडक उन्हाळ्यात रक्ताची टंचाई “……
रुग्णांना रक्त मिळण्यासाठी " रक्तदान शिबिरे " घेण्याचे रक्तदाते " राजाभाऊ कोठारी सरांचे " आवाहन !

” तुम्ही जगा व दुसऱ्यालाही जगवा ” हेच मानवतेचे दर्शन…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात दर वर्षी मार्च – एप्रिल – मे – व जून महिन्याचे १५ दिवस या कालावधीत ” रक्ताचा तुटवडा ” खूपच जाणवतो. या दरम्यान विध्यार्थ्यांच्या परीक्षा असतात, उन्हाचा पारा खूपच जास्त असतो व सर्व महाविद्यालयाना सुट्टी असते. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थां मार्फत मोठ्या प्रमाणात होणारी रक्तदान शिबिरे थांबलेली असतात. तसेच अनेक जण सुट्टीमध्ये आपल्या गावी जातात किंवा परगावी फिरायला जातात. त्यामुळे रक्तदानाचे प्रमाण खूपच कमी झालेले असते. परिणामी रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतो. मात्र अशा परिस्थितीत ” थेलेसेमिया ” नावाच्या आजारी रुग्णांचे खूप हाल होतात . म्हणूनच मानवतेचे दर्शन घडविण्यासाठी ” तुम्ही जगा व दुसऱ्यालाही जगवा “, या उदात्त हेतूने रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन सार्वजनिक रक्तदाते ” राजाभाऊ कोठारी सर ” यांनी शैक्षणिक संस्था , सामाजिक संस्था , राजकीय पक्ष , संघटना , तरुण मंडळ , यांना केले आहे .
आज काल धावपळीच्या युगात नवनवीन आजार तोंड वर काढत आहेत , फास्ट फूड च्या खाण्याने अनेकांना अकाली व्याधी होत असतात , त्यातच ” थेलेसिमिया ” या आजाराने थैमान घातले आहे , असे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत येत असून त्यांच्या शरीरात रक्त पेशी नसल्याने रक्त तयार होत नाही , अश्याने त्यांना बाहेरून दर १५ दिवसांनी रक्त चढवावे लागते. अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्या पालकांची खूपच धावपळ हॊते , त्यामुळे जीवावर बेतण्याची शक्यता असते , तसेच मार्च, एप्रिल, मे व जून या महिन्यात विविध शस्त्रक्रियांचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे रक्ताची खूपच टंचाई भासते. त्यामुळे सर्व गरजू रुग्णांना आपण वेळेवर रक्त उपलब्ध करुन देऊ शकत नाही.
यासाठीच गेल्या तीन महिन्यांपासून सार्वजनिक रक्तदाते ” राजाभाऊ कोठारी सर ” यांनी विविध सामाजिक संस्था , शैक्षणिक संस्था , विविध राजकीय पक्ष , संघटना व इतरांना रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते , मात्र केवळ फक्त तीनच रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली. किमान दहा रक्तदान शिबिराचे आयोजन अपेक्षित हॊते परंतु ते शक्य झाले नाही , यामुळे रक्त हवे असलेल्या सर्व गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करू शकत नाही , अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे .
याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करत , सर्वांना विनंती केली आहे की , शक्य असल्यास छोटी – मोठी रक्तदान शिबिरे आयोजित करुन आपल्या तालुक्यातील ” रक्ताची टंचाई ” कमी करण्यास हातभार लावावा. जेणे करून गरजू रुग्णांना मदत करणे शक्य होईल , असे आवाहन महारक्तवीर – रायगड भूषण राजाभाऊ कोठारी सर यांनी केले आहे . यासाठी संपर्क ७०५८९३६२५१ या नंबर वर करण्यास सांगितले आहे .




