दिल्ली NCR

…..” कर्जत कल्याण रोड वर डिकसळ येथे साइड पट्टी खोदण्याचे काम , अपघाताला आमंत्रण “……

” सागर शेळके ” यांनी घेतला आक्षेप…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत तालुक्यातील डिकसल येथे भर रस्त्याची साईड पट्टी खोदल्यामुळे ऐन पावसाळ्यात माती मुळे ” अपघात ” होण्याची शक्यता असून , या विरोधात स्थानिक रहिवासी व राष्ट्रवादीचे नेते ” सागर शेळके ” यांनी आक्षेप घेतला आहे.

          सदरच्या रस्त्याची साईड पट्टी नक्की कोण खोदतोय आणि ती कशासाठी ? याचे निदान समजले नाही. संबंधित ठेकेदार साइड पट्टी खोदून ठेवतात , मात्र हा वाहतुकीचा रस्ता असल्याने वाहनांची सतत ये जा असते , यामुळे अपघात होण्याची शक्यता असते , तर पावसाने माती रस्त्यावर पसरून रस्ता चिकट होतो , यामुळे २ चाकी वाहनांना अपघाताचा धोका असतो. अशी अनेक प्रसंग घडले असल्याने , अश्या खोदकामामुळे धोका असतो. 

          सदरचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य कक्षेत असल्याने संबंधित कार्यालयाच्या अधिकारी वर्गाने याकडे लक्ष देण्याची मागणी सागर शेळके यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!