……” सबका साथ – सबका विचार – सबका अधिकार , चला लागा तयारीला “……
सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढविता यावी म्हणून " स्वबळाचा नारा " किरण दादा ठाकरे यांचा एल्गार !

कर्जतमध्ये ” भाजपाची ” पत्रकार परिषदेत ” एकला चलो रे ” ची घोषणा…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषदेत दारूण पराभव झाल्याने सावधगिरीची भूमिका घेत कर्जत तालुक्यात ” भारतीय जनता पक्षाने ” पक्षातील जनमानसात काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीत उभे रहाण्यासाठी पक्षाध्यक्ष रविंद्र चव्हाण व खासदार धैर्यशील पाटील यांच्या पुढाकाराने कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्हाला पाहिजे त्या जागा मित्र पक्ष शिवसेना किंवा इतर पक्ष देत नसल्याने ” स्वबळावर ” निवडणुका लढविण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे सांगत , कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख ” किरण दादा ठाकरे ” यांनी पत्रकार परिषद घेऊन ” एल्गार ” केला . भाजप पक्षाची ताकद दाखविण्यासाठी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरून पक्ष नेतृत्वाच्या आदेशाची वाट बघा , असा संकेत देखील त्यांनी दिला आहे . त्यामुळे कर्जत तालुक्यात भाजपा मित्र पक्षाने दिलेल्या जागांना न जुमानता ” एकला चलो रे ” या भूमिकेत असून उमेदवारांची मोठी फौज आज भाजप नेते किरण दादा ठाकरे यांच्या पाठीशी दिसून येत आहे .
गुरुवार दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दादा ठाकरे यांनी भाजप संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार जाहीर केले . यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की , आमचा उमेदवार कष्टकरी कुटुंबातील असेल , नाही ते ” ३०२ – ३०७ – ४२० ” चे आरोपी , ना तो पोलीस रेकॉर्ड वरचा ” गुन्हेगार ” असेल , तर आमचा उमेदवार जनतेमध्ये जाऊन काम करणारा सर्वसामान्य उमेदवार असेल . म्हणून अश्या उमेदवारास निवडून देण्याचे निवडणूक प्रमुख किरण दादा ठाकरे यांनी मतदारांना विनंती व आवाहन केले . अजून आमची युती किंवा आघाडी झालेली नाही , म्हणून आम्ही ” स्वबळाचा नारा ” देत आहोत , यावर त्यांनी प्रकाश टाकला. कर्जत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्हाला निवडून द्या , असे आवाहन करत मागील काळात आम्ही करोडो रुपयांचा विकास निधी आणला आहे , याची आठवण करून देत पक्ष श्रेष्ठी जो निर्णय देतील त्याप्रमाणे आम्ही काम करू , हे सांगत कर्जत नगर परिषद निवडणुकीत पराभवामुळे कार्यकर्ते नाराज झाले असल्याने , व त्यातच युतीची बोलणी झाली नसल्याने आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांवर उमेदवारी स्वबळावर लढवित आहोत .
यावेळी जिल्हा परिषद गट माणगांव तर्फे वरेडी – राधिका किशोर ठाकरे , नेरळ – सौ. नम्रता नितीन कांदळगावकर , कडाव – मिनेश भगवान मसने , कळंब – सचिन रामचंद्र लोखंडे , तर पंचायत समिती गणात कळंब – सविता विष्णू गावंडा , कशेळे – राजू चिंधु केवारी , माणगाव – केशव बबन तरे , उकरूळ – सुप्रिया राजेश भगत , नेरल – नम्रता नितीन कांदळगावकर , दामत – नरेश सुरेश मसणे , वाकस – विठ्ठल बाबू भागीत , मोठे वेणगाव – सुनिल आंग्रे , बीड – गीता नरेश देशमुख असे दमदार उमेदवारांची यादी या पत्रकार परिषदेत प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस ऋषिकेश जोशी यांनी जाहीर केली .
यावेळी या पत्रकार परिषदेत सर्व उमेदवार व विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दादा ठाकरे , ऋषिकेश जोशी – प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस , दिनेश रसाळ – कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष , निलेश पिंपरकर – कर्जत ग्रामीण मंडल सरचिटणीस , किशोर ठाकरे , सचिन जगताप , जगदीश भोपी , समिर बोराडे , काशीनाथ रसाळ , योगेश ऐनकर – चिटणीस ग्रामीण मंडल , दिपक डायरे , यशवंत दुर्गे , प्रज्ञेश खेडकर , आदी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .



