…..” जनता मंदिर प्रशाला दहिवली येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात “…..
विद्यार्थ्यांनी " जिद्द - चिकाटीच्या " जोरावर यश संपादन करावे - रेल्वे निरीक्षक शिरिष कांबळे

यशस्वी विद्यार्थ्यांना केले सन्मानित…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी ” जिद्द आणि चिकाटीच्या ” जोरावर ” यश ” संपादन करून शिक्षण क्षेत्रात ” गरुड भरारी ” घ्यावी , असा यशाचा मंत्र कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली येथील जनता मंदिर प्रशाला येथे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात मुंबई सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ निरीक्षक ” मा. श्री.शिरिष कांबळे ” यांनी दिला . छत्रपती शिक्षण मंडळ संचलित, दहीवली-कर्जत येथील जनता विद्यामंदिर प्रशालेत सन २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक ” स्नेहसंमेलन आणि गुणगौरव ” समारंभात ते बोलत होते . हा समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला . विशेष म्हणजे या उत्साहवर्धक कार्यक्रमाच्या विचारपीठावर याच शाळेतून शिक्षण घेऊन उच्चशिक्षित अधिकारी झालेले माजी विद्यार्थी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते . त्यातीलच एक अधिकारी ” शिरीष कांबळे ” आहेत .
यावेळी या कार्यक्रमाच्या विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. नंदकिशोर जोशी अध्यक्ष, छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण , प्रमुख पाहुणे मा. श्री. शिरिष कांबळे – माजी विद्यार्थी व वरिष्ठ निरिक्षक कमर्शियल मुंबई सेंट्रल रेल्वे , प्रमुख वक्ते – मा. महेंद्र घारे – समन्वयक लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, कर्जत , विशेष उपस्थिती – मा. अलोक कसबे (फिल्म दिग्दर्शक) , मा. सुनीलजी नांदुस्कर (उपसेक्रेटरी, विठ्ठल मंदिर संस्थान) , विशेष निमंत्रित मा. डॉ. निलेश रेवगडे – सरचिटणीस, छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण , कर्जत नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. रजनी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .
आज शिक्षण क्षेत्रात ” अव्वल ” व्हायचे असेल तर फक्त पुस्तकी ज्ञान असून उपयोगाचे नसून व्यवहारिक अभ्यास असणे गरजेचे आहे . सुनियोजित पद्धतीने टेन्शन मुक्त राहून अभ्यास करून त्यात अतीव कष्ट असणे गरजेचे असल्याचे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ” लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ” चे समन्वयक श्री. महेंद्र घारे यांनी व्यक्त केले . या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगात असलेल्या सुप्त – कौशल्यपूर्ण – कला गुणांना वाव देण्यासाठी शिक्षक प्रतिनिधी सौ. वैशाली नेमाडे यांच्या प्रयत्नाने राबविलेला उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेले लेख आणि कवितांच्या ” हस्तलिखित ” या संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमाची सर्व मान्यवरांनी ” वाहवा ” केली . तसेच या कार्यक्रमात माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा व इंग्लिश विषयांत ९४ गुण मिळवलेल्या आणि वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी शाळेच्या प्रगतीचा वार्षिक आढावा शाळेचे मुख्याध्यापक प्रताप गिते सरांनी मांडला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रतिभा उपासनी मॅडम यांनी केले , तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक प्रमुख सुनील शेंडे सर यांनी केले . या कार्यक्रमास सौ. शलाका घरत – मुख्याध्यापिका, पूर्व प्राथमिक , शिवशंकर झावरे – क्रीडा प्रमुख , महेश देशपांडे – अध्यक्ष, शालेय समिती , सौ. ज्योती दिसले – मुख्याध्यापिका, प्राथमिक , सौ. मनिषा गायकवाड – सांस्कृतिक प्रमुख (प्राथ.) , श्री. अनंत शिंदे – शिक्षकेतर प्रतिनिधी , विद्यार्थी संसद प्रतिनिधी – कु. समीर कांबेरे , कु. वैष्णवी गायकवाड , कु. अनुज जोरी – सांस्कृतिक प्रमुख , कु. परीन धुळे , कु. विदिशा जाधव आदी उपस्थित होते . तर पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका शलाका घरत, ज्योति घरत यांच्यासह सर्व शिक्षक कर्मचारी यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला . याप्रसंगी मोठ्या संख्येने पालक – विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .
यशस्वी विद्यार्थ्यांना केले सन्मानित…..



