Uncategorized

…..” रस्त्यावर कचरा टाकून परिसर दुर्गंधीयुक्त करणारे माथेफिरू नागरिक मोकाट “……

कर्जत नगर परिषदेच्या कामगारांचा वारंवार " साफसफाई " करून जीव टांगणीला !

मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” यांनी कारवाई करण्याची अपेक्षा…..

 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ” लाखोंची बक्षिसे ” मिळवलेल्या व अनेक ” पारितोषिक ” पटकावलेल्या कर्जत नगर परिषदेचा ” सेनापती ” बदलला असल्याने आता कर्जत नगरीत ” अस्वच्छतेचे ” वादळ उठले असून अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी ” माथेफिरू नागरिक ” अस्ताव्यस्त कचरा टाकत असल्याने ” दुर्गंधीयुक्त ” परिसर झाल्याने ” रोगराईला ” पूरक वातावरण बनले असल्याने कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छता कामगारांचा अतिरिक्त काम करून ” जीव टांगणीला ” येत असून वारंवार तक्रारी करून देखील कर्जत नगर परिषदेचे ” बुजगावणे ” मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” हे अश्या मस्तवाल नागरिकांवर कडक व दंडात्मक कारवाई करत नसल्याने अनेकांना या गंभीर बाबीचा त्रास होत आहे .

कर्जत नगर परिषद हद्दीतील स्टेशन लगत असलेला व धापया मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यालगत रहाणारे रहिवासी रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकत आहेत . या परिसरात कर्जत नगर परिषदेची घंटा गाडी येत असताना उघड्यावर वारंवार कचरा टाकला जात आहे . उघड्यावर कचरा टाकू नका , असे सांगूनही हा कचरा टाकला जात असल्याने परिसरात घाणीचे व दुर्गंधीयुक्त वातावरण असते . मोकाट कुत्रे व गुरे यांचा वावर देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसत असून चालताना नागरिकांत भीतीचे वातावरण असते . हा कचरा वारंवार येथून स्वच्छता कामगारांना उचलावा लागत असल्याने कामगारांत देखील संतापाचे वातावरण असते .

 

अश्या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण हे कुठलीच कारवाई करत नसल्याने नागरिक देखील बिनबोभाट येथे कचरा कुंडी बनवून कचरा टाकत आहेत . यामुळे कर्जत नगर परिषदेच्या कामगारांचा वारंवार साफसफाई करून जीव टांगणीला लागत असून , कित्ती वेळा अशी साफसफाई करायची ? नागरिक का ऐकत नाहीत ? मुख्याधिकारी कधी , कुणावर कारवाई करणार ? असा संतप्त सवाल ऐकण्यास मिळत आहे . तरी कर्जत न. प. च्या मुख्याधिकारी यांनी यावर तातडीने कारवाई करावी , अशी जोरदार मागणी नागरिकांत व सोशल मीडियावर होत असताना दिसत आहे .

कर्जत न.प. चे ” रामदास कोकरे ” हे मुख्याधिकारी असताना स्वच्छतेबाबत ” पुरस्कार ” मिळालेल्या या नगर परिषदेवर सेनापती रुपी मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” हे आल्यावर स्वच्छतेचे ” तीन – तेरा ” वाजले असल्याचे चित्र मात्र कर्जत नगरीत सर्वत्र दिसत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!