…..” आमचा पराभव स्वप्नात देखील करू शकत नाही “……
मंत्री " आशिषजी शेलार " यांचा कर्जत नगर परिषद निवडणूक " प्रचार दौऱ्यात " एल्गार !

कर्जत नगर परिषदेवर ” महायुतीचा झेंडा ” फडकणार…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

महायुतीच्या उमेदवारांचा ” विजय ” नक्की आहे , ही नैसर्गिक युती आहे , म्हणून विजयी पक्का आहे , आपला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुशिक्षित , उच्च शिक्षित , कामसू वृत्तीच्या असल्याने विजयी पक्का आहे , तसेच आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” व माजी आमदार ” सुरेश भाऊ लाड ” हातात हात घेऊन विरोधकांशी लढत असल्याने आपला विजयी पक्का आहे , आमचा पराभव स्वप्नात देखील करू शकत नाही , विरोधकांचे कुणाचे बाळ कुठे आहे , कुणाच्या खांद्यावर आहे ? हेच समजत नाही , ” उबाठा ” कडे जो जाईल तो रसातळाला गेला , भुईसपाट झाला , असे खडे बोल ” महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व आय टी मंत्री आशिषजी शेलार ” यांनी कर्जत नगर परिषद निवडणुकीत आयोजित केलेल्या महायुतीच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ सौ स्वाती अक्षय लाड व सर्व उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यात सुनावत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना तुम्ही तर आमचे आहेत , तुम्ही तरी असे वागू नका , असा टोला देखील लगावला .
यावेळी या प्रचार दौऱ्यात मंत्री आशिषजी शेलार यांच्या समवेत आमदार महेंद्र शेठ थोरवे , आमदार प्रशांत ठाकूर , माजी आमदार सुरेश भाऊ लाड, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी , जिल्हा उपाध्यक्ष वसंत शेठ भोईर , विधानसभा प्रमुख किरण भाऊ ठाकरे , नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ सौ स्वाती अक्षय लाड , जिल्हा नेते तानाजी चव्हाण , जिल्हा महासचिव दिपक बेहेरे , सचिव रमेश दादा मुंढे , आर पी आय चे कोकण कार्याध्यक्ष राहुलजी डाळींबकर , उप सभापती मनोहर दादा थोरवे , संकेत भासे , विधानसभा संघटक दिलीप ताम्हाणे , राजेश भगत , दशरथ मुने , मंगेश म्हसकर , बडगुजर , दिनेश भरकले , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी हा प्रचार दौरा गुंडगे प्रभाग , भिसेगाव , रॉयल गार्डन व दहिवली येथे कॉर्नर सभा घेऊन मंत्री आशिषजी शेलार यांनी उमेदवार व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . यावेळी ते पुढे म्हणाले की , आमची युती ओरिजनल आहे , तुमचे काय आहे ? अशी टिका करत , घरापर्यंत पाणी आलं पाहिजे पण ते येईपर्यंत डोळ्यातून पाणी आणून देऊ नका , म्हणूनच हर घर जल , हे काम आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले , रस्ते ही चकाचक आहेत , शहर सौंदर्यीकरण केले आहे , येथे विकास कार्याला सुरेश भाऊंनी सुरुवात केली , व आता आमदार महेंद्र शेठ थोरवे हे करत आहेत . पर्यावरणाला त्रास होईल , अशी कुठली इंडस्ट्री आणणार नाही , अशी संकल्पना येथील आमदारांची आहे . विरोधकांकडे काहीच काम नाही , वरती बसलेले फडणवीस व शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा नळ सुरू करणार व कर्जत पर्यंत येऊन ते पाणी थांबणार , कचरा आला तर मी ते काढण्यास समर्थ आहे , यावर प्रकाश टाकत महायुतीचे उमेदवार ” डॉ सौ स्वाती अक्षय लाड ” या डॉ असल्याने नाडी बघून , नागरिकांच्या समस्या सोडविणार आहेत , सुचिता वांजळे व ऋषिकेश जोशी यांचे विशेष नाव घेऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले , ” कमळ व धनुष्यबाण ” चिन्हावर मत म्हणजे विकास कार्याला मत आहे , २ तारखेला मतांची सुनामी येऊ द्या , असे सांगत ” ये फेविकॉल का जोड है , तुटेगा नहीं ” , विरोधकांची अभद्र आघाडी झाल्याने अपप्रचार होणारच , म्हणून विरोधकांचा ” साफडा सूफ ” करून महायुतीला विजयी करा , असे आवाहन आशिष जी शेलार यांनी समस्त प्रचार दौऱ्यात कॉर्नर सभेत केले . यावेळी महायुतीचे सर्व उमेदवार या प्रत्येक प्रचार दौऱ्यात उपस्थित होते .




