……” कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे ४६ वे राज्य अधिवेशन १९ ऑक्टोबर सोमवारी नागपूरात “……
मुख्यमंत्री " देवेंद्र फडणवीस " यांच्या हस्ते उद्घाटन , शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर होणार चर्चा !

रायगडात कोकण विभाग अध्यक्ष ” संजीव मोरे ” व महसूल जिल्हाध्यक्ष ” राहुल सूर्यवंशी ” यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे व इतर अधिकाऱ्यांना दिले निमंत्रण…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ ( रजि.) या देशव्यापी कर्मचारी संघटनेचा ४६ वे राज्यव्यापी अधिवेशन सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथे मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य , यांच्या प्रमुख उपस्थितीत कुसुमताई वानखेडे भवन , उत्तर अंबाझरी रोड, शंकर नगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ” देवेंद्र फडणवीस ” यांच्या हस्ते होणार असून राज्याचे शिक्षण मंत्री ” दादाजी भुसे ” प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. महासंघांचे प्रदेश अध्यक्ष ” कृष्णा इंगळे ” हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील.

या अधिवेशनात राज्यातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करून महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. पदोन्नतीतील आरक्षण, आरक्षणाचा अनुशेष, जुनी पेन्शन योजना, वेतनातील त्रुटी आणि कर्मचान्यांचे अन्य प्रलंबित मागण्यां बाबत शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या प्रश्नांवर शासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन कर्मचाऱ्यांच्या पुढील भवितव्यासाठी खूपच महत्वाचे असल्याने मोठ्या संख्येने साक्षीदार होऊन या अभुतपुर्व सोहळ्यास उपस्थित राहावे , यासाठी कोकण विभागाचे अध्यक्ष ” संजीव मोरे ” तसेच महसूल विभागाचे रायगड जिल्हाध्यक्ष ” राहुल सूर्यवंशी ” हे अथक प्रयत्न करत असून त्यांनी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच कोकण भवन येथे देखील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबतीत निमंत्रण दिले आहे.

या अधिवेशनाचे प्रमुख अतिथी मा. नितीन राऊत माजी मंत्री तथा आमदार उत्तर नागपूर , मान. एम.एस. रेड्डी भा.व. से प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य , डॉ. लालसिंग मिसाळ उपसंचालक भूमी अभिलेख नागपूर , प्रा. देवीदास घोडेस्वार – प्रसिद्ध लेखक संविधान अनुवादक तथा संविधान विषयी तज्ञ , ॲड. विक्रम मारपतवार अधिवक्ता उच्च न्यायालय नागपूर , आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय कास्ट्राईब कर्मचारी महासंघांचे राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष , संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष यांची उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष संजीव मोरे व महसूल जिल्हाध्यक्ष राहुल सूर्यवंशी यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात ” किशन जावळे ” यांची सदिच्छा भेट घेऊन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या नागपूर येथे आयोजित ४६ व्या अधिवेशनाची निमंत्रण पत्रिका सादर करून कार्यक्रमाची रूपरेषा व आयोजना संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे मा. कुटे मॅडम – सह आयुक्त कोकण विभाग , मा. रूबल अग्रवाल, आयुक्त कोकण विभाग , मा. मुकादम मॅडम – अप्पर आयुक्त कोकण विभाग , राजिप च्या सीईओ मॅडम , जिल्हा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण , जिल्हा कोषागार अधिकारी , डिस्ट्रिक ट्रेझरी ऑफिसर , जिल्हा दुय्यम निबंधक शेडगे साहेब ,रवींद्र पवार – सह आयुक्त करमणूक , तथा प्रभारी सहआयुक्त पुरवठा कोकण विभाग कोकण भवन , इंद्रायणी उंटवाल मॅडम – अप्पर आयुक्त महसूल कोकण विभाग , यांना निमंत्रण देण्यात आले.

तरी या राज्य अधिवेशनात राज्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तसेच शिक्षक संघटनेचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सर्व कार्यकर्ते यांनी आवर्जुन उपस्थित रहावे , असे आवाहन मान. संजीवजी मोरे साहेब – कोकण विभागीय तथा रायगड जिल्हा अध्यक्ष , कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व राहुल सूर्यवंशी – जिल्हाध्यक्ष महसूल रायगड , कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांनी केले आहे.





