……” शिक्षण हेच प्रगतीचे मूळ , सुधाकर भाऊ घारे यांचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटप करून सागर भाऊ शेळके यांनी केला साजरा “……
माणगाव जिल्हा परिषद वार्ड मध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप !

” सागर भाऊ शेळके ” यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे , व तेच पुढील जीवनात प्रगतीचे मूळ असल्याने विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी येऊ नये , म्हणून नेहमीच विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे देवून शिक्षण घेण्यास गरुड भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ देणे हि आपली नैतिक जबाबदारी समजून उदात्त भावनेने दरवर्षी राष्ट्रवादीचे युवा नेते सागर भाऊ शेळके मदत करत असतात. आपले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राजिप चे माजी उपाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांच्या १७ ऑक्टोबर रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून माणगाव जिल्हा परिषद वार्ड मधील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना सागर भाऊ शेळके यांच्या पुढाकाराने व वॉर्डमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने वह्या वाटप कार्यक्रम राबवण्यात आला.

या शुभप्रसंगी परिसरातील डिकसल, पाली, उमरोली, आशाने, कोषाने, वावे, उक्रूळ, बार्डी, वडवली, आसल, भुतीवली, आसल पाडा, आशाने ठाकूरवाडी, आणि भानसोली येथील रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना एकूण २००० वही वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शिक्षण हेच प्रगतीचे मूळ आहे, याच विचाराने सुधाकर भाऊंच्या वाढदिवशी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा हा छोटासा प्रयत्न होता , असे मत यावेळी सागर भाऊ शेळके यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

या स्तुत्य उपक्रम प्रसंगी माणगाव जिल्हा परिषद वार्ड मधील व डिकसळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





