……” निराधार कन्येला लग्नासाठी आधार , सागर भाऊ शेळके यांचा सुधाकर भाऊ घारे यांच्या जन्मदिनी स्तुत्य संकल्प “…….

विनामूल्य विवाह – जेवण – कन्यादानाचा खर्च ” प्रतीक्षा हॉल ” मध्ये करणार !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
नेहमीच उदार मनाने गरजवंतांना मदत करून त्यांची समस्या सोडविण्याचा हातखंडा असणारे तर सामाजिक कार्याचा वसा घेऊन आपण हि या समाजाचे काही देणे आहोत , हि उदात्त भावना उराशी बाळगून विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारे कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील दानशूर व्यक्तिमत्त्व तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सागर भाऊ शेळके हे आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राजिप चे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या वाढदिवसानिमित्त एका निराधार कन्येच्या आयुष्यात आनंदाची नवीं पहाट यावी , यासाठी कर्जत तालुक्यातील निराधार कन्येला तिच्या विवाहाची संपूर्ण व्यवस्था विनामूल्य करून कन्यादान करण्याचे स्तुत्य उपक्रम करणार आहेत. यामाध्यमातून मा. सुधाकरभाऊ परशुराम घारे यांचा वाढदिवसाचा आनंद ते साजरा करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांच्या आज असलेल्या दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यातील आई – वडिलांचे ” छत्र ” हरपलेल्या एका गरजू व निराधार मुलीच्या विवाहासाठी डिकसळ येथे असलेल्या ” प्रतीक्षा हॉल ” मध्ये विवाहाची संपूर्ण व्यवस्था ” सागर भाऊ शेळके ” विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत. तसेच, विवाहाच्या दिवशी भोजनाची व्यवस्था आणि कन्यादानाची जबाबदारीही देखील ते स्वतः स्वीकारणार आहेत.या विवाहसोहळ्यात आदरणीय सुधाकरभाऊ घारे यांच्या शुभहस्ते कन्यादान संपन्न व्हावे, ही सागर भाऊ यांची मनापासून इच्छा आहे.

एका निराधार कन्येच्या संसाराची सुरुवात ” सन्मानाने ” व्हावी, तिच्या चेहऱ्यावर ” आनंद ” फुलावा आणि तिला ” मायेचा ” आधार मिळावा, या उदात्त भावनेतून हा छोटासा सामाजिक संकल्प हाती घेताना मला मनस्वी समाधान व आनंद होत आहे. कारण, खरा आनंद स्वतःसाठी जगण्यात नाही, तर दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद फुलवण्यात असतो , सुधाकरभाऊ , आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदात्त भावनेतून केलेला हा छोटासा सामाजिक संकल्प आहे , असे भावनिक मत हा स्तुत्य उपक्रम सांगताना त्यांनी व्यक्त करत यासाठी श्री. सागर भाऊ शशिकांत शेळके , प्रतीक्षा हॉल – डिकसळ , कर्जत , संपर्क – 9921984324 या नंबरवर करावा , असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते ” सागर भाऊ शेळके ” यांनी केले आहे.




