…..” संतोष बैलमारे खोट बोलत आहेत , मी व्हॉट्स ॲप कॉल केलेला पण , अशी काही धमकी दिली नाही “…..

आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांचा खुलासा !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सावरोली जिल्हा परिषद सदस्य ” संतोष बैलमारे ” यांनी आपल्याला आमदार महेंद्र थोरवे यांनी व्हॉट्स ॲप कॉल करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तंगडी तोडून ठार मारण्याची धमकी दिली होती , असा आरोप केला होता , हे आरोप आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांनी फेटाळले आहेत. संतोष बैलमारे यांना मी व्हॉट्स ॲप कॉल केलेला पण मी त्या कंपनीतील कामाविषयी बोलणे झालं पण तंगडी तोडून जीवे ठार मारून टाकेन , अस काहीही बोललो नाही , असे स्पष्ट मत व्यक्त करत नवरात्रीचे दिवस आहेत , नव दुर्गेचा कोप होईल , असा खुलासा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केला आहे.
काल राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे यांनी कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मला व्हॉट्स ॲप कॉल करून शिवी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात करून या मतदार संघात खळबळ उडवून दिली होती. यावर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी खुलासा करत संतोष बैलमारे खोटे बोलत आहेत , हे सांगून रायगड पोलीस अधीक्षक यांनी क्लिप तपासावी , हे सांगून सत्य समोर आणले आहे.
ऐन नवरात्रीत अशी घटना घडल्याने रायगडाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना व राष्ट्रवादीत धूम्मचक्री उठणार , असे चित्र दिसत आहे.



