…..” कर्जतमध्ये रक्तदान शिबिर भरवून ” श्री धापया देवस्थान समिती – कर्जत व MGM हॉस्पिटल – कामोठे ” यांचे देशव्यापी कार्य “…….
कर्जत - खालापुर तालुक्यातील " ५४९ " वे रक्तदान शिबिर संपन्न !

महा रक्तवीर ” राजाभाऊ कोठारी ” सरांचा पुढाकार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत खालापूर मतदार संघात महा रक्तवीर राजाभाऊ कोठारी सरांनी रक्तदानात ” रक्तविरहित क्रांती ” केली असून त्यांच्या पुढाकाराने राजकीय पक्ष , संघटना , मंडळे , संस्था , समिती या स्वयंस्फूर्तीने ” रक्तदान शिबिरे ” भरवून देशव्यापी कार्यात सहकार्य करत आहेत.

शारदीय नवरात्री उत्सवा निमित्ताने रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत धापया मंगल कार्यालय – कर्जत येथे ” श्री धापया देवस्थान समिती – कर्जत व MGM हॉस्पिटल – कामोठे , यांचे विद्यमाने कर्जत – खालापूर तालुक्यातील ” ५४९ ” वे रक्तदान शिबिर ” महा रक्तवीर राजाभाऊ कोठारी ” सरांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी एकूण ३२ रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय – सामाजिक – व मानवतावादी कार्य करुन सहकार्य केले.

याच बरोबर नाक, कान व घसा तपासणीचे मोफत आरोग्य शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते . या शिबिरात सुमारे ७५ नागरिकांनी सहभाग घेवून तपासणी केली. तसेच ई.सी.जी. व एन्जॉग्राफी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी एकूण ५५ नागरिकांनी तपासणी करून घेतली. यावेळी सतीश शेठ पिंपरे यांनी आपले वैयक्तिक ” ८० वे ” रक्तदान करून महत्त्वपूर्ण कार्य केले.

या प्रसंगी कर्जत नगरपरिषद गटनेता तथा बांधकाम सभापती नगरसेवक महेंद्र चंदन , नगरसेवक प्रशांत ऊर्फ बाबु पाटील, नगरसेविका स्नेहा शिंदे , नगरसेवक ॲड. रोहित ओसवाल , ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे , जयवंत म्हसे , डॉ. प्रशांत सदावर्ते, विनोद पांडे , सलीम टिवाले , गणेश शिंदे , माजी नगरसेवक मुकेश पाटील, नितीन गुप्ता , गौरव भानुसघरे, सतिशशेठ पिंपरे , सचिन दगडे, भाई आणेकर , फरहान चौगुले , लाला चौगुले, शकील शेख , सफवान चौगुले, बिलाल आढाल आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी रक्तसंकलनाचे काम कामोठे येथील एम.जी.एम हॉस्पिटल च्या रक्त केंद्राचे डॉक्टर , टेक्निशियन व आरोग्य सेवकांनी उत्तम पद्धतीने काम केले , तसेच आरोग्य शिबीर हार्मनी फाऊंडेशन व सुश्रुषा हॉस्पिटल यांच्या आरोग्य टीमने उत्तम पद्धतीने केले.
रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी श्री धापया देवस्थान समितीचे गौरव भानुसघरे, गणेश शिंदे , महेंद्र चंदन ( पाटील), मुकेश पाटील, नितीन गुप्ता , प्रशांत पाटील , कुणाल भोबू , निलेश गायकवाड ,भाई आणेकर , रोहित भोबू , योगेश लोवंशी , सुधिर आढळ , हेमंत पवार , राजु वाळुंज , संतोष पिंगळे , प्रथमेश मगर , कुणाल गुप्ता , सुयोग मांडे , प्रसाद बोराडे , रोहिदास सुर्वे , जय दगडे , यश ठाकरे , आशिष पाटील , अमित गुप्ता , विजय पाटील , हेमंत जाधव , मंगेश भोईर , महेश सारडा , मंगेश भोईर व ईतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या देशव्यापी कार्यात सहभाग घेतलेल्या वरील सर्वांचे मनःपुर्वक आभार ” श्री धापया देवस्थान समितीने व सार्वजनिक रक्तदाता तथा नगरसेवक राजाभाऊ कोठारी सरांनी ” व्यक्त केले.




