……” शिवसेनेचे नगरसेवक ” ॲड संकेत दादा भासे ” यांच्याकडून सर्व कर्जतकर नागरिकांना ” विजयादशमी – दसऱ्याच्या ” शुभेच्छा व्यक्त “……

कर्जतचा सर्वांगीण ” विकास ” करण्यास बळ मिळो……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. सत्याचा – असत्यावर , न्यायाचा – अन्यायावर आणि सद्गुणांचा – दुर्गुणांवर विजय मिळवण्याचा संदेश देणारा हा उत्सव. हा सण आपल्या जीवनात ” नवीन ऊर्जा, सकारात्मक विचार आणि प्रेरणा ” निर्माण करणारा आहे. या मंगलमय विजयादशमीच्या शुभप्रसंगी कर्जत नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा गटनेते नगरसेवक ॲड. संकेत दादा भासे यांनी सर्व कर्जतकर नागरिकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, आनंद आणि यश नांदो , आपल्या कर्जत शहराची सर्वांगीण प्रगती होवो, शहरात शांतता – बंधुभाव आणि एकोपा कायम राहो, तसेच आपले शहर विकासाच्या नव्या उंचीवर पोहचो, नवनवीन विकास कार्य करण्यास आम्हाला बळ मिळो , अशी आजच्या दिनी त्यांनी प्रार्थना केली आहे.
या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर द्वेष, मत्सर आणि नकारात्मक विचारांचा त्याग करून प्रेम, सद्भावना आणि सामाजिक एकतेचा संकल्प करूया. असा संदेश देखील नगरसेवक तथा शिवसेनेचे युवा नेते ॲड. संकेत दादा भासे यांनी या शुभेच्छातून व्यक्त केला आहे.




