…..” कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालय ऑफ फार्मसी व रिसर्च इन्स्टिटय़ूट , कर्जत (कपिल पाटील शैक्षणिक इन्स्टिटय़ुट द्वारा संचालित) च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न “……
महा रक्तवीर " राजाभाऊ कोठारी " सरांच्या सहकार्यातून " ५४६ " वे रक्तदान शिबिर संपन्न !

३४ रक्तदात्यांनी ” रक्तदान ” करून केले देशव्यापी कार्य…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालय ऑफ फार्मसी व रिसर्च इन्स्टिटय़ूट , कर्जत (कपिल पाटील शैक्षणिक इन्स्टिटय़ुट द्वारा संचालित) ” च्या वतीने तसेच ” समर्पण रक्त केंद्र ” घाटकोपर व मेडिकल टेक्नॉलॉजिसट असोसिएशन ऑफ रायगड , यांच्या सहकार्याने कर्जत – खालापुर तालुक्यातील ” ५४६ वे ” रक्तदान शिबीर व ” ॲनेमिया अवेअरनेस प्रोग्रॅम ” बुधवार दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय,कोंकण ज्ञानपीठ शैक्षणिक संकुल, वेणगाव रोड, दहिवली – पराडे , पोस्ट: तिवरे, ता- कर्जत, जि.रायगड येथे आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. त्यापैकी ३४ जणांनी रक्तदान केले व ११ जणाना हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्यामुळे रक्तदान करता आले नाही.

या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या मूर्तीस व सरस्वतीच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी कोंकणा ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालय ऑफ फार्मसी आणि रिसर्च सेंटर कर्जत , चे प्राचार्य मोहन काळे यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत केले , तसेच रक्तदान व अनेमिया बद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले , तर आबिद खान यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. रक्तदाते राजाभाऊ कोठारी सरांनी रक्तदाना बद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले व सर्वांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले .

याप्रसंगी ट्रस्टी झुलकरशेठ डाभिया, ज्येष्ठ पत्रकार विजयराव मांडे, मेडिकल टेक्नॉलॉजिसट असोसिएशन ऑफ रायगड चे अध्यक्ष अबीद खान, उपाध्यक्ष किरणज्योती , सदस्य कल्पेश पटेल, अभिलाषा पटेल व सुमित जाधव , लेक्चरर श्वेता दांगट , असिस्टंट प्रोफेसर मुक्ता गोचडे , आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.अतुल त्रिपाठी यांनी स्लाइड शो द्वारे ऑनलाइन ॲनेमिया या आजाराबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया खापे व सोनम मॅडम यांनी केले .
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजाभाऊ कोठारी, डॉ.मोहन काळे, झुलकरशेठ डाभिया , ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे व प्रोफेसर निलोफर खान यांच्या शुभ हस्ते फित कापुन करण्यात आले.
याप्रसंगी रक्त संकलनाचे काम घाटकोपर येथील ” समर्पण रक्तकेंद्राचे ” डॉ.रमेश सिंग,नर्स शिला वाघमारे, नर्स अनिता कौटनकर, टेक्निशियन अनघा,एम.एस.डब्ल्यू दिपेश सरदार, पीआर श्रीराम नाईक, पीआर प्रदीप नितोरे,सुनिल निले आदी आरोग्य सेवक यांनी उत्तम पद्धतीने केले.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी तुषार घारे, सानिका जाधव, आदित्य अलिकडे, रूद्र जाधव , प्रणव जाधव , हेमंत जाधव,भाग्यश्री पोद्दार , राज गुप्ता, रिद्धी, श्रद्धा वाघचौरे , भाविका सोनावणे , संजित घोडके , हर्षाली कल्पेश , ऋतुजा सावंत , प्रथम बाबरिया , साहिल चौधरी असावरी चव्हाण , सिद्धांत आदी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

रक्तदान सारख्या देशव्यापी कार्यात भाग , सहकार्य , मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आभार डॉ. मोहन काळे – प्रिन्सिपॉल कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर , फार्मसी महाविद्यालय, कर्जत- रायगड , व राजाभाऊ कोठारी सर – रायगड भूषण , महारक्तवीर ,सार्वजनिक रक्तदाता तथा रक्तदान शिबिर संयोजक , कर्जत – रायगड यांनी व्यक्त केले.



