दिल्ली NCR

…..” आता वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना , कर्जत शहर बचाव समितीचा अजून एक षटकार “……

" उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड " यांच्या दालनात यशस्वी बैठक !

” योग्य विषय – सुनियोजित आखणी – अंतिम निर्णय “…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत शहरातील ” वाहतूक कोंडीबाबत ” मार्ग काढण्यासाठी ” योग्य विषय – सुनियोजित आखणी – अंतिम निर्णय “, अश्या त्रिसूत्रीचा वापर करून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी आज गुरुवार दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता ” कर्जत शहर बचाव समितीची ” वाहतूक कोंडी समस्येबाबतची महत्त्वाची बैठक कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी ” राहुल गायकवाड ” यांच्या दालनात घेण्यात आली . या बैठकीला कर्जत शहर बचाव समितीचे मुख्य कार्यवाहक ॲड. कैलास मोरे , भाऊ खानविलकर , कृष्णा जाधव , विकास दादा चित्ते , धर्मेंद्र दादा मोरे , भीमराव गाडे , स्वीटी बार्शी , विजय बेडेकर , सतीश मुसळे , केशव मोरे , अतुल पवार , प्रशांत उगले तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

          यावेळी झालेल्या बैठकीत कर्जत शहर बचाव समितीने पुढील प्रमुख मुद्दे मांडले. 

१) चार फाटा येथील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. 

२) रेल्वे ब्रिज ते नमस्ते हॉटेल दरम्यान रोडच्या मध्ये गणपती उत्सवा नंतर डिव्हायडर उभारले जाणार. 

३) चार फाटा येथील सिग्नल लवकरच सुरू करण्याचे आश्वासन.

४) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी ऑटोमॅटिक ई-चलन कॅमेरे बसविण्याबाबत सकारात्मक चर्चा. 

५) गुगल मॅपच्या माध्यमातून वाहतूक कोंडीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्याचे नियोजन. 

६) चार फाटा हा वाहतूक कोंडीचा प्रमुख केंद्रबिंदू असल्याने छोट्या बायपास मार्गांवर कर्मचारी नियुक्त करून वाहतूक नियंत्रणात ठेवण्याचे नियोजन.

७) मुख्य बाजार पेठेतील दररोजची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर चर्चा.

८) गर्दीच्या वेळेत मुख्य बाजारपेठेत येणाऱ्या मोठ्या वाहनांना बाजारपेठेबाहेर थांबविण्याबाबत उपाययोजना करण्याची सूचना.

९) मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे दि. १२ मार्च २०२६ रोजीच्या अवजड वाहनांसाठी लागू असलेली बंदीची वेळ तातडीने अंमलात आणून कारवाई सुरू करण्याची मागणी.

१०) शाळांच्या परिसरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी.

११) शाळा व शहर परिसरात बेशिस्तपणे बाइक चालविणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी.

१२) दहिवली परिसर, आयोध्या परिसर, लहान पुलाजवळील गार्डन तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी.

१३) सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे व अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत चर्चा.

१४) कर्जत शहरातील वाहतूक समस्येवर पोलीस विभाग आणि कर्जत शहर बचाव समिती यांच्या समन्वयातून ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय.

१५) ट्रॅफिक व पार्किंग नियोजनासाठी अनेक विभागाच्या परवानगीचा प्रश्न येतो यासाठी कर्जत नगरपरिषद, पीडब्लुडी, एमएमआरडीसी अशा विभागांची एकत्रित बैठक मा.प्रांत साहेब किंवा तहसीलदार साहेब यांच्याकडे लावणे बाबत. 

           या सर्व प्रमुख मुद्द्यांची उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी वाहतूक समस्येबाबत सकारात्मक भूमिका घेत, शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत वाहतूक व्यवस्थेबाबत अनेक महत्त्वपूर्ण व निर्णायक मुद्द्यांवर चर्चा झाली , त्यामुळे ” कर्जत शहर बचाव समितीने ” वाहतूक कोंडीवर कायम स्वरुपी योजना आखून नक्कीच ” षटकार ” मारल्याचे दिसून येत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!