……” कर्जत तालुक्यातील आश्रम शाळेत आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांचा पाहणी दौरा “…….
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा " भालीवडी " येथे " पिंक रूम " उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी......

विद्यार्थिनींच्या ” सुरक्षितता, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी ” अभिनव पाऊल , तालुक्यात या आश्रम शाळेचा १ नंबर उपक्रम……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील असलेल्या आदिवासी मुलींच्या आश्रम शाळेबद्दल कसे नियोजन आहे ? याबाबतीत आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी नुकतेच संबंधित भालीवडी , पाथरज , चाफेवाडी , पिंगळस या आश्रम शाळेला पत्र दिले होते . त्या अनुषंगाने त्यांनी भालीवडी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, भालीवडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षितता, आरोग्य, मानसिक आधार आणि व्यक्तिमत्त्व या विषयी नुकताच पाहणी दौरा केला असता विकासासाठी ” पिंक रूम ” या महत्त्वपूर्ण उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असल्याचे या पाहणी दौऱ्यात समोर आले आहे. भालीवाडी आश्रम शाळेत योग्य नियोजन असून तालुक्यात ” १ नंबरची आश्रम शाळा ” असल्याचे या पाहणी दौऱ्यानिमित्त त्यांनी येथील मुख्याध्यापक मोहन पडघान , सचिंद्र पाटील – अधीक्षक , सुयोगी भगत – अधिक्षिका , वाल्हे – ग्रंथपाल यांचे कौतुक केले आहे.

या आश्रम शाळेत विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक जीवनात येणाऱ्या ” विविध अडचणी, आरोग्यविषयक समस्या, भावनिक समस्या तसेच वैयक्तिक प्रश्न ” मोकळेपणाने मांडता यावेत , आणि त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळावे, असा ” पिंक रूम ” उपक्रमाचा मुख्य उद्देश दिसण्यात आला. ” पिंक रूम ” च्या माध्यमातून विद्यार्थिनींना महिला आरोग्य व स्वच्छता विषयक मार्गदर्शन, समुपदेशन, आत्मविश्वास वाढविणारे उपक्रम, जीवन कौशल्य शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे. या उपक्रमाची संकल्पना प्रकल्प अधिकारी ” मा. गलांडे मॅडम ” यांची असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. तसेच मुख्याध्यापक ” श्री.मोहन पडघान सर ” यांच्या नियोजनातून आणि मार्गदर्शनातून विद्यालयात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

यामध्ये अधीक्षिका ” सौ. सुयोगी भगत ” यांनी विद्यार्थिनींच्या गरजा लक्षात घेऊन विशेष प्रयत्न केले असून, अधीक्षक ” श्री. सचिंद्र पाटील सर ” यांचेही व्यवस्थापन व सहकार्य लाभले आहे. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य करून विद्यार्थिनींसाठी सकारात्मक वातावरण निर्मिती केली आहे.

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा भालीवडी येथे राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी एक ” प्रेरणादायी पाऊल ” ठरत आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थिनींचे ” आरोग्य, सुरक्षितता आणि आत्मविश्वास ” यांना प्राधान्य देणारा हा उपक्रम भविष्यात निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
सदर उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रकल्प अधिकारी मा. गलांडे मॅडम, मुख्याध्यापक श्री.मोहन पडघान सर, अधीक्षिका सौ. सुयोगी भगत, अधीक्षक श्री. सचिंद्र पाटील सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. ” पिंक रूम ” चा उद्देश मुलींना सुरक्षित आणि आरामदायी जागा उपलब्ध करून देणे , मुलींना त्यांच्या समस्या मोकळेपणाने मांडता याव्यात , यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे. मानसिक आधार देणे – तणाव, भीती, चिंता किंवा भावनिक अडचणी असलेल्या मुलींना समुपदेशन व भावनिक आधार मिळवून देणे. आरोग्य विषयक जागरूकता वाढवणे – मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता, पोषण आणि किशोरवयीन आरोग्य याबाबत योग्य माहिती देणे. गोपनीयता राखणे – वैयक्तिक किंवा संवेदनशील विषयांवर चर्चा करताना मुलींची माहिती आणि समस्या गोपनीय ठेवणे.आत्मविश्वास वाढवणे – मुलींना स्वतःचे निर्णय घेण्यास, प्रश्न विचारण्यास आणि आपले मत व्यक्त करण्यास प्रोत्साहित करणे. शैक्षणिक व सामाजिक मार्गदर्शन – शिक्षण, करिअर, कौशल्यविकास आणि सामाजिक प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणे. अडचणींची योग्य ठिकाणी दखल घेणे – छळ, हिंसा, भेदभाव किंवा इतर गंभीर समस्या असल्यास योग्य व्यक्ती / यंत्रणेकडे मदत मिळवून देणे. सकारात्मक आणि समावेशक वातावरण निर्माण करणे – मुलींमध्ये परस्पर सहकार्य, सन्मान आणि समानतेची भावना वाढवणे. या महत्त्वपूर्ण गोष्टी दिसून आल्या.

तसेच व्यवस्थित किचन , सुंदर जेवण , उत्कृष्ट तेल , तांदूळ – डाळी – पोहे सर्व साहित्य चांगल्या व उत्कृष्ट , त्याचप्रमाणे संपूर्ण आश्रमशाळेत परिसर स्वच्छता , अंतर्गत रस्ते स्वच्छ व सुंदर सर्व वर्ग , बसण्याचे स्वच्छ संडास बाथरूम स्वच्छ आदींची रूपरेखा पाहणी दौऱ्यात दिसून आले. त्यामुळे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा भालीवडी तालुका कर्जत येथे ” पिंक रूम ” उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी दिसण्यात आली.
त्याचप्रमाणे यावेळी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात , महाराष्ट्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे चालवल्या जाणाऱ्या व कर्जत तालुक्यातील येथील या सर्व आदिवासी मुलींच्या आश्रम शाळा आहेत , सदर त्यामधील गडचिरोली येथील कुपारलिगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित अनुदानित प्राथमिक – माध्यमिक आश्रम शाळा जपतलाई येथील आश्रम शाळेत रविवार दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या ” इंग्रज चले जाव ” घोषणेला ( ९ ऑगस्ट १९४२ ) ८४ वर्षाच्या मध्यरात्रीला एक ज्वलंत दुःखद दुर्दैवी घटना घडली आहे , सदर आश्रम शाळेतील तीन आदिवासी विद्यार्थिनींना ” मण्यार ” सापाच्या विषारी दंशामुळे मृत्यू झाला आहे. त्या अनुषंगाने आपणास सदर पत्राद्वारे विनंती करण्यात येते की , सर्व विद्यार्थिनींचे सर्वतोपरी काळजी घेऊन शासनातर्फे मिळणाऱ्या सर्व सुविधांचे ऑडिट करण्यात यावे , अशी विनंती करण्यात आली.
या यशस्वी उपक्रमाची ” रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाचे कर्तबगार कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड ” यांनी या सर्व बाबींचे कौतुक करून खाजगी शाळेला लाजवेल अशी कर्जत तालुक्यात ” १ नंबरची ” शासकीय आश्रमशाळा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या समवेत तालुका महासचिव अशोक गायकवाड , तालुका प्रवक्ते प्रेमनाथ जाधव , कर्जत शहर अध्यक्ष ॲड. उदय जाधव हे उपस्थित होते.



