……” शिवसैनिकांच्या अभुतपुर्व साक्षीने पालकमंत्री ” मा.ना.श्री.भरतशेठ गोगावले ” यांचा शिवतीर्थ येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न “…..
" कटूनितीचे डाव " खेळाल तर तुमचं " राजकारण " संपवून टाकू - आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा खासदार सुनील तटकरे यांच्यावर टिकास्त्र !

” राजकीय दबावतंत्राचा ” वापर करून ” संघर्षशील नेतृत्वाला ” रोखण्याचे प्रयत्न , अखेर ” सत्याचा ” विजय……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” राजकीय दबावतंत्राचा ” वापर करून ” संघर्षशील नेतृत्वाला ” रोखण्याचे प्रयत्न आज पर्यंत केला गेला , मात्र अखेर सत्याचा ” विजय ” होऊन छत्रपतींच्या भूमीत महाडचे मंत्री ” मा. ना.श्री. भरतशेठ गोगावले यांची पालकमंत्री पदी निवड हा विजय शिवसेनेचा, भगव्याचा, रायगडच्या स्वाभिमानाचा ” अशी गगनभेदी गर्जना विरोधकांवर टीकास्त्र फेकत कर्जत खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे ” यांनी अभूतपूर्व गर्दीत नवनिर्वाचित ” पालकमंत्री भरतशेठ गोगावले ” यांच्या सत्कार सोहळ्या कार्यक्रमात शिवतीर्थ – पोसरी येथे सभागृहात केली.

याप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती रायगडचे नवनिर्वाचित पालकमंत्री मान. नामदार भरत शेठ गोगावले , मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते शहाजी बापू पाटील , अलिबागचे आमदार महेंद्र दळवी , कर्जत मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे , जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , संघटक विजय पाटील , विधान सभा संघटक शिवराम बदे , खालापूर सभापती भाई शिंदे , कर्जत ता. प्रमुख सुदाम दादा पवाळी , संघटक संभाजी जगताप , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , जिल्हा युवा प्रमुख प्रसाद थोरवे , राजिप मा. अध्यक्ष सुरेश दादा टोकरे ,

मा. नगरसेवक बाळाजी विचारे , माथेरान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी , खोपोली नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे , माजी सभापती तथा युवा ता. प्रमुख अमर मिसाळ , विरोधी पक्ष नेते ॲड संकेत दादा भासे , शहर प्रमुख संजय मोहिते , शिवाजी खारीक , भास्कर दिसले , मा नगरसेवक मोहन औसरमल , संघटक अरुण देशमुख , आर पी आय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम भाई खान , विभाग प्रमुख गणेश पालकर , सुनील ठाकूर , मा. पंचायत समिती सदस्य मीना थोरवे , भाजप जिल्हा नेते तानाजी चव्हाण , जिल्हा महासचिव दिपक बेहरे , मा. नगराध्यक्ष शरद भाऊ लाड , जिल्हा संघटक राजेश भगत , मा. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , राजिप मा. समाज कल्याण सभापती सुभाष दादा गवळे , मा. सरपंच उत्तम सोनावणे , संघटक दिलीप ताम्हाणे , शिवाजी देशमुख ,

त्याचप्रमाणे कर्जत – खोपोली – माथेरान – खालापूर न. प. च्या सर्व नगरसेवक – नगरसेविका , शिवसैनिक , युवा सेना , महिला आघाडी मोठ्या संख्येने या अभुतपुर्व सोहळ्यास उपस्थित होते. या सर्वांच्याच उपस्थितीत पालकमंत्री मान. नामदार भरत शेठ गोगावले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर टिकास्त्र साधत रेल्वे उड्डाण पूल , याबाबत करत असलेल्या ” दिशाभुलीचा ” चांगलाच समाचार घेतला. यापुढे कटुनितीचे डाव टाकाल तर आम्ही खपवून घेणार नाही , तुमचं राजकारण संपवून टाकू , अशी गगनभेदी आरोळी ठोकली.
राजकीय दबावतंत्राचा वापर करून संघर्षशील नेतृत्वाला रोखण्याचे प्रयत्न झाले, मात्र ज्यांच्या पाठीशी संघर्षाची ताकद आणि जनतेचा विश्वास आहे, अशा नेतृत्वाला कोणीही रोखू शकत नाही, अखेर सत्याचीच ” जीत ” झाली , असा टोला देखील त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगडावर स्वराज्याची राजधानी उभारली, त्या ऐतिहासिक आणि स्वाभिमानी रायगड जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळणे ही अभिमानाची बाब आहे. हा विजय केवळ नामदार भरतशेठ गोगावले यांचा नसून ” शिवसेनेचा – भगव्याचा आणि रायगडच्या स्वाभिमानाचा ” विजय असल्याचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी नमूद केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर , आमदार महेंद्रशेठ दळवी , खासदार श्रीरंग आप्पा बारणे , शिवसेना उपनेते शहाजीबापू पाटील यांनी देखील नामदार पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे अभिनंदन करत मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अनेकांचा पक्ष प्रवेश झाला.




