मनसे रायगड जिल्हा सचिव पदी कर्जत नगर परिषदेचे ” मा. नगरसेवक धनंजय दुर्गे ” यांची नियुक्ती !
" मान. राजसाहेब ठाकरे " यांचे प्रखर विचार घेऊन कार्य करणारा " डॅशिंग " कार्यकर्ता !

” मनसे ” पक्ष जोमाने वाढविणार – धनंजय दुर्गे……
भिसेगाव- कर्जत/सुभाष सोनावणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा , तथा मराठी हृदय सम्राट ” मा. राजसाहेब ठाकरे ” यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात ” मनसे ” पक्षाची पाळेमुळे सर्वदूर पसरली असून रायगड जिल्हाध्यक्ष ” बाळा शेठ म्हात्रे ” यांच्या नुकत्याच झालेल्या नियुक्तीने जिल्ह्यात पक्ष संघटना वाढत असताना मध्य रायगड जिल्हा सचिव पदी कर्जत नगर परिषदेचे मा. नगरसेवक धनंजय दुर्गे यांची नियुक्ती दस्तुरखुद्द मा. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली . त्यांच्या या नियुक्तीने महाराष्ट्र नव निर्माण पक्षात उत्साहाचे वातावरण असून त्यांच्यावर सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . 
कर्जत नगर परिषद हद्दीत मुद्रे प्रभागात रहाणारे मा. नगरसेवक धनंजय दुर्गे हे कर्जत तालुक्यातील मनसेची स्थापना झाली तेंव्हापासून एकनिष्ठ मनसे सैनिक आहेत. आजपर्यंत त्यांनी कर्जत शहर प्रमुख , कर्जत – खालापूर विधानसभा सचिव अशी पदे यशस्वीपणे सांभाळली आहेत . आजपर्यंत कर्जत तालुक्यात मनसे तर्फे राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात, रस्ते आंदोलन, क्रोध मोर्चे, निषेध धरणे, संतापजनक जाब बैठका, वीज प्रश्न, पाणी प्रश्न, कोरोना काळात खाजगी बँकेचे हफ्ता प्रकरण, यात नेहमीच पुढे राहून गरीब गरजू नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत शहरातील विकास कामांविरोधात आवाज उठवून प्रशासनाचे नेहमीच लक्ष वेधले आहेत. त्यांच्या या आक्रमक पवित्रामुळेच त्यांची मनसे पक्ष श्रेष्ठीने स्वीकृत नगरसेवक म्हणून कर्जत नगर परिषदेवर वर्णी लावली होती . त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकिर्दीत त्यांनी आपल्या मुद्रे प्रभागाबरोबरच शहरातील अनेक विकास प्रश्नांचा आवाज उठवून ती विकास कामे करवून घेतली आहेत.
मनसे अध्यक्ष तथा मराठी हृदय सम्राट ” मा. राजसाहेब ठाकरे ” यांचे नेहमीच आदेशाचे पालन करणारे कर्जत तालुक्यातील ” डॅशिंग नेतृत्व ” म्हणून त्यांच्याकडे बघितले जाणारे ” मा. नगरसेवक धनंजय दुर्गे ” यांच्या कार्यावर खुश होऊन पक्ष संघटना वाढीसाठी त्यांच्यावर दिलेली ” रायगड जिल्हा सचिव ” पदाची धुरा ” सन्माननीय श्री. राज साहेब ठाकरे आणि युवा अध्यक्ष श्री. अमित साहेब ठाकरे ” यांच्या आदेशाने रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष तथा नेते संदीपजी देशपांडे , सरचिटणीस योगेश परुळेकर , राजेश येरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा अध्यक्ष बाळा शेठ म्हात्रे , उपजिल्हाध्यक्ष अभिजीत घरत यांच्या मान्यतेने धनंजय दुर्गे यांची (रायगड जिल्हा सचिव) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे .
पक्षाचा आदेश मानून मनसे पक्ष जोमाने वाढवून , ही जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य असेच कायम राहू द्या. असे मत यावेळी रायगड जिल्हा सचिव ” धनंजय दुर्गे ” यांनी व्यक्त केले .




