…….” नदीम भाई खान तरुणांचा बुलंद आवाज , वाढदिवस एका आक्रमक युवा नेत्याचा “……
कर्जत तालुक्यातील राजकीय - शैक्षणिक - धार्मिक क्षेत्रात अव्वल कार्य !

” शिवसैनिक ते कर्जत शहर संघटक ” एक डॅशिंग नेतृत्व ” नदीम भाई खान “……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आयुष्यात कोण कुणाला , काय देत , मात्र ज्या स्फूर्तीदायक नेत्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या विचारांचा ” भगवा झेंडा ” खांद्यावर घेऊन ” छत्रपतींचे ” विचार सर्वदूर पसरविण्यात खारीचा वाटा उचलत ” शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब ” यांचे कडवट ध्येय उराशी बाळगून ” शिवसेना ” सारख्या धगधगत्या अग्निकुंडात तरुण वयात उडी घेऊन शिवसेनाच माझी जात , तर भगवा माझा सोबती , अशी खुणगाठ बांधून आज ज्यांच्या प्रेरणा रुपी आशीर्वादाने – सहवासाने या मतदार संघात आपल्या कर्तृत्वाचा व मदत कार्याचा ठसा उमटवून ” कार्यसम्राटांच्या ” विजयात खारीचा वाटा उचलणारा ध्येयवेडा मावळा म्हणजे ” शिवभक्त नदीम भाई युसुफ खान “. नुकताच या शिवसेनेच्या कट्टर नेतृत्वाचा ” वाढदिवस ” मोठ्या उत्साहात साजरा झाला . दस्तुरखुद्द कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी खास उपस्थिती दर्शवून ” नदीम भाई ” यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या , हा आनंदाचा व प्रेरणादायी क्षण खूपच आल्हाददायी वाटला.


त्यांच्या वाढदिवसाला झालेली तरुणांची गर्दी हि खरोखरच त्यांची ताकद व त्यांच्या कार्याला नतमस्तक होणारी दर्दी साथी होते. नदीम भाई खरोखरच कर्जत तालुक्यातील युवकांचा आवडता नेता म्हणून दिसले. गरीब परिस्थिती मधून प्रगतीची वाट काढणारा नदीम भाई एक योद्धा वाटले. समस्याग्रस्त – गोर गरिबांच्या अडचणी सोडवत , अनेकांना त्यांचे हक्क देवून त्यांच्या गळ्यातील ” ताईत ” बनलेले त्यांचा ” बुलंद आवाज ” व या तरुण शक्तीच्या पाठिंब्याने आज कर्जत खालापूर मतदार संघाचे ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या खास तालमीतील मर्जी सांभाळणारा एक युवा नेतृत्व वाटले. अनेक संघटनात्मक – धार्मिक – राजकीय पदे सांभाळत ” शिवसैनिक ते कर्जत शहर संघटक ” असा ” डॅशिंग प्रवास ” करणारे ” आक्रमक युवा नेतृत्व ” वाटले.

शिवसेनेच्या अनेक मातब्बर नेत्यांच्या मुशीत घडलेले नदीम भाई खान यांनी राजकीय पटलावर आक्रमक भूमिका घेत अनेकांना केलेल्या सहकार्यातून त्यांच्या वाढदिवसाला दिलेल्या बॅनरबाजी , मोबाइलद्वारे , सोशल मीडियावर , प्रत्यक्ष भेटून केलेला शुभेच्छांचा वर्षाव , हिच त्यांची खरी पूंजी असून , हिच युवा शक्ती त्यांची ताकद आहे. या ताकदी मागे खूप मोठा ” संघर्ष ” दडलेला असल्याचे चित्र त्यांच्या या राजकीय इतिहासात दिसून येत आहे.

शनिवार १५ ऑगस्ट २०२६ देशाच्या स्वातंत्र्य दिनी त्यांचा झालेला वाढदिवस , त्यांना मिळालेल्या अभूतपूर्व शुभेच्छा , प्रेरणादायी नेतृत्व असलेले कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे आशीर्वाद रुपी डोक्यावर ठेवलेला हात , आई वडिलांचे भक्ती रुपी शक्ती , जिवलग मित्रांची साथ , पत्नीची सावली सारखी मदत , मुलाची धडपड तर शैक्षणिक – राजकीय – धार्मिक – सामाजिक – सांस्कृतिक – व्यापारी – संघटनात्मक क्षेत्रातील मान्यवर , पदाधिकारी व बहुजन वर्ग , पत्रकार बांधव , महिला भगिनी यांनी वाढदिवसानिमित्त नदीम भाई खान यांना शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील भरभराटीचे उदंड आयुष्याच्या ” ईश्वर चरणी ” प्रार्थना करत होते.





