दिल्ली NCR

…..” सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी – उपजिल्हा प्रमुख एकच वादा नितीन दादा सावंत “……..

कर्जत खालापूर मतदार संघातील " परिवर्तन विकास आघाडीचे " शिल्पकार !

विरोधकांना ” चारीमुंड्या चितपट ” करणारे ठरले नेतृत्व……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाची ” वज्रमूठ ” म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते , तर परिवर्तन विकास आघाडीचे शिल्पकार उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांचे नेतृत्व विरोधकांना चारीमुंड्या चितपट करणारे या मतदार संघात ठरले आहे .

           कमी बोलण पण विकास कामे अधिक अशी कार्यपद्धत तर आपल्या चेहऱ्यावर ” शांत स्मित हास्य ” देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ” वज्रमूठ ” बनून सर्व शिवसैनिकांना पडत्या काळात नेतृत्व देवून ” शिव बंधनात ” बांधून ” एकसंघ ” ठेवणारे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख तथा कर्जत नगर परिषदेचे ” हॅट्रिक ” साधून मा. गटनेते अशी विविध पदे सांभाळून पक्षाला ” नवसंजीवनी ” देणारे नितीन दादा सावंत यांचे नेतृत्व राजकीय पटलावर ” युक्ती आणि शक्तीच धगधगत अग्निकुंड ” च म्हणावे लागेल . ” तू चाल गड्या पुढे तुला भीती कुणाची ” , असा करारी बाणा शिवसेना ठाकरे गटाला मिळालेला एक ” अनमोल हिराच ” म्हणावा लागेल. 

 

        शिवसेना प्रमुख ” बाळासाहेब ठाकरे ” यांच्या ज्वलंत अग्निकुंडात शेकून निघालेले व प्रखर विचाराने घडलेले ” नितीन दादा सावंत ” ऐन तारुण्यात ” शिवसेना ” सारख्या तळपत्या सूर्यप्रकाशात तेजोमय होत त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली . गरजवंताना मदतीचा हात देणे , हा त्यांचा स्वभाव असल्याने अडल्या नडल्यांना उपयोगी पडत ” ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ” हा शिवसेना पक्षाचा ” महामंत्र ” घेवून त्यांचे कार्य उदयास आले . त्यांच्या या कार्याची पोच पावती म्हणून कर्जत नगर परिषदेच्या २००९ साली त्यांना कोतवाल नगर – मुद्रे परिसरातून शिवसेनेने उमेदवारी दिली . त्यांच्या कार्याचा वाढता आलेख , मित्र परिवार , कडवे शिवसैनिक व बहुसंख्य नागरिकांनी त्यांना निवडून दिले . पालिकेत सत्ता असो वा नसो त्यांचा ” जनता दरबार ” नेहमीच भरलेला असायचा . त्यांच्याकडे समस्या घेवून आलेल्या नागरिकांचे काम १०० टक्के ” हमी ” देवून ते पूर्ण करतात , म्हणूनच असा दमदार लोकप्रतिनिधी पालिकेत पुन्हा असावा , यासाठी नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा सन २०१४ साली निवडून दिले . त्यावेळी देखील त्यांचे कार्य सर्वदूर पसरून त्यांची प्रतिमा नागरिकांच्या मनामनात बसली . सन २०१९ साली ते दहीवली – बामचा मळा येथून उभे राहिले . ” आव्हान स्वीकारणारे ” त्यांचे नेतृत्व असल्याने आपला प्रभाग नसताना देखील बहुमताने पुन्हा एकदा निवडून येवून त्यांनी विजयाची सलग ” हॅट्रिक ” केली . पालिकेत गटनेते होवून त्यांनी विकासाचे चांगले विषय घेवून ते मंजुरी मिळवून सर्वच प्रभागात त्यांचे ” विकास कार्य ” आजही पहाण्यास मिळत आहेत . त्यांच्या कार्यकिर्दित पालिकेवर २ वेळा शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान झाला , तर येथील विधानसभेत शिवसेनेचा ” बालेकिल्ला ” अबाधित ठेवण्यास त्यांचा त्याकाळी खारीचा वाटा आहे .

         अखंड असलेली शिवसेना फुटल्यावर कर्जत – खालापूर मतदार संघात प्रथम त्यांनी पुढाकार घेवून शिवसैनिकांना आधार देत वज्र मुठीप्रमाने एकत्रित ठेवले , हे त्यांचे कार्य ” ” ढाण्या वाघाला ” शोभेल असे असल्याने ” मातोश्री ” वरून पक्ष प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर ” उपजिल्हा प्रमुखाची ” जबाबदारी सोपवली . आज जे काही शिवसेनेला संजीवनी देण्याचे कार्य केले , ते त्यांनी योग्य पद्धतीने ” लिलया ” सांभाळले असून तरुणांची जबरदस्त फौज त्यांनी तयार केली आहे . तरुणांना रोजगार मेळावा , कब्बडी स्पर्धा , क्रिकेट सामने , बैल गाडा शर्यती , महिला भगिनींना हळदी कुंकू समारंभ , पैठणी साडी वाटप कार्यक्रम , रक्तदान शिबिर , आरोग्य शिबीर , शासकीय दाखले शिबिर , ग्रामीण भागात पाणी वाटप , अन्न धान्य वाटप , अशी विविध सामाजिक कार्यक्रमातून त्यांचे नेतृत्व राजकीय पटलावर ” चमकत ” असून या मतदार संघाचे विधानसभेचे नेतृत्व करण्याची त्यांची संधी जरी ” हुकली ” असली तरी ते भविष्यात ” आमदार ” होणार , अशी जिद्द त्यांनी सोडली नाही . मातोश्री वरून त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणे , हि बाब देखील ” अलौकिक ” असल्याचे बोलले जाते . कर्जत खालापूर विधान सभा मतदार संघात त्यांच्या बुद्धीने केलेली परिवर्तन विकास आघाडीमुळे विरोधकांना ” चारीमुंड्या चितपट ” करून अभूतपूर्व यश त्यांनी जिल्हा परिषद , पंचायत समिती व कर्जत नगर परिषदेत मिळवून विजयी संपादन केल्याने शिवसैनिकांना देखील त्यांनी सत्तेचा वाटा दिला आहे . भिवपुरी येतील टाटा वीज कंपनीच्या विरोधात त्यांनी भूमिपुत्रांसाठी केलेले आंदोलन देखील चांगलेच गाजले .

         शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तमाम शिवसैनिक – युवा सेना – महिला आघाडी – मित्र परिवार व अनेक नागरिकांच्या आशीर्वादाने भविष्यात ते बाजी मारून या मतदार संघात ” मशाल ” पेटवून विजयी होतील व या मतदार संघाचे ” आमदार ” होतील , अशाच शुभेच्छा त्यांच्या ०३ ऑगस्ट २०२६ या त्यांच्या जन्मदिनी देवून त्यांच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो , हिच ईश्वरचरणी प्रार्थना , व जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!