Uncategorized

…..” भिसेगाव प्रभागातील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था “…..

" स्वच्छ महाराष्ट्र अभियान " योजनेचे वाजले तीन तेरा !

शौचालयात सुविधांचा अभाव , कर्जत नगर परिषदेवर नागरिकांचा संताप…..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

केंद्र सरकारच्या ” स्वच्छ भारत अभियान ” तर राज्य शासनाच्या ” स्वच्छ महाराष्ट्र अभियान ” हि योजना संपूर्ण गावागावात , शहरात राबविले जात असताना त्यामाध्यमातून शौचालये उभारणी व त्यांची स्वच्छता राखणे अशी नियमावली बनविलेली असताना कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील असलेले एकमेव सार्वजनिक शौचालयाची अनेक वर्षे लक्ष न दिल्याने त्याची दुरावस्था झाली आहे . कर्जत न. प. च्या २ वर्षाचा कालावधी हा मुख्याधिकारी यांचा ” प्रशासकीय राजवटीचा ” असल्याने या काळात या शौचालयाकडे तथा नागरिकांच्या या प्रमुख समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने कर्जत नगर परिषदेच्या या कारभाराचा नागरिकांत संताप खदखदत आहे . 

     

  ” प्रत्येक घरात शौचालय ” अशी राज्य शासनाची योजना असताना भिसेगाव प्रभागात पूर्वापार रहाणारे गोर – गरीब – कष्टकरी आदिवासी यांच्या घरात शौचालये नसल्याने आदिवासी वाडी व भिसेगाव प्रभागातील अनेक कुटुंबे या शौचालयाचा वापर करत आहेत . स्त्री व पुरुष सुविधा असलेल्या या शौचालयाची अवस्था खुपचं, दयनीय झाली आहे . येथे घाणीचे साम्राज्य असून शौचालयास दरवाजे देखील् नाहीत . शौचालयावर गवत सुकलेले आहे , तर आजुबाजूला गवत वाढलेले आहे , त्यामुळे येथे साप विंचूची भीती नाकारता येत नाही , तर शेजारी जुनी तुटलेली शौचालये अजूनही पडक्या अवस्थेत आहेत .

          कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” यांनी तातडीने या शौचालयास भेट देऊन आपल्या ” प्रशासकीय राजवटीत ” झालेल्या शौचालयाच्या दुरावस्थेस जबाबदार समजून शौचालयाची स्वच्छता , दरवाजे लावणे , लाईट व इतर समस्या सोडवून जुने झालेले हे शौचालय त्वरित नव्याने शौचालये बांधून देण्याची मागणी ” छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटना ” व ” भिसेगाव ग्रामस्थांनी ” केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!