…..” गॅस सिलेंडर टंचाईचा नागरिकांना त्रास तर हॉटेल रिसॉर्ट व्यवसायावर परिणाम “……
कर्जत तालुक्यातील हॉटेल - रिसॉर्ट - फॉर्म हाऊस बंद करण्याच्या अवस्थेत !

कर्जत तहसीलदार ” धनंजय जाधव ” मूग गिळून गप्प , त्यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांत ” संतापाची ” लाट……..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
गेली आठ दिवसांपासून कर्जत तालुक्यातील नागरिक ” गॅस सिलेंडर ” टाकी मिळत नसल्याने रस्त्यावर भर उन्हात उभे राहून सिलेंडर च्या प्रतीक्षेत आहेत , तर दुसरीकडे पर्यटन क्षेत्रात कर्जत तालुका नावारूपाला येत असताना हॉटेल , रिसॉर्ट , फॉर्म हाऊस सिलेंडर अभावी जेवण कसे करायचे म्हणून बंद पडण्याच्या प्रतिक्षेत असून हॉटेल व्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होणार असताना कर्जतचे तहसीलदार ” धनंजय जाधव ” मात्र मस्त रविवारच्या सुट्टीचा आनंद उपभोगत असल्याचे संताप जनक चित्र कर्जत तालुक्यात पहाण्यास मिळत आहे . याविरोधात रिसॉर्टचे मालक सागर शेळके यांनी गॅस सिलेंडर अभावी रिसोर्ट बंद करण्याची परिस्थिती उद्भवली असल्याची भीती दर्शवून चुलीवर जेवण बनवावे लागत असल्याचे मत व्यक्त केले आहे .
कर्जत तालुक्यातील नागरिकांना कौटुंबिक जीवनासाठी गॅस सिलेंडर मिळत नाही . ऑन लाइन मोबाईलवर बुकिंग होत नाही , कॉल लागत नाही , म्हणून नागरिक गॅस सिलेंडर कार्यालयात जात आहेत , तिथेही २५ दिवसानंतर गॅस सिलेंडर टाकी मिळेल , अशी माहिती मिळत आहे , म्हणून नागरिक भर उन्हात रस्त्यावर उतरले आहेत . त्यांना ना सावली , ना पाणी . याविरोधात कर्जत शिवसेना उप तालुका प्रमुख बॉबी शेठ वाघमारे यांनी आवाज उठवत याचा जाब भारत गॅस चे मालक ठक्कर यांना विचारला आहे . एकीकडे या गोष्टी अफवा आहेत , म्हणून सोशल मिडिया व वृत्त पत्रात येत आहेत , मात्र नक्की सत्य परिस्थिती काय आहे , हे सांगणे कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांचे कर्तव्य असताना ते सुट्टीचा आनंद घेत असताना दिसत आहेत , तहसीलदार धनंजय जाधव यांच्या या ” कर्तव्यात कसूर ” करणाऱ्या भूमिके विरोधात नागरिकांत तीव्र संताप पसरला असून धनंजय जाधव यांनी याबाबतीत खुलासा करावा , अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे .
कर्जत तालुक्यात ५ हजार च्या आसपास रिसोर्ट मालक , हॉटेल व्यावसायिक , फॉर्म हाऊस , छोटे मोठे व्यावसायिक असून ते या विरोधात बंड ठोकणार की काय ? त्यांच्या या व्यवसायाला येणाऱ्या पर्यटकांवर विपरीत परिणामाला सामोरे जावे लागत असल्याने रिसॉर्ट मालक सागर शेळके यांनी चुलीवर जेवण बनवावे लागत आहे , मात्र हे चित्र व्यवसाय बंद करण्याच्या परिस्थितीवर आल्याने भीती व्यक्त केली आहे. मात्र कर्जत तालुक्याचा संबंधित अधिकारी असलेले तहसीलदार ” धनंजय जाधव ” हे मात्र अजून मूग गिळून गप्प आहेत , म्हणून त्यांच्या या भूमिकेवर नागरिकांचा संताप अनावर होत आहे .





