Uncategorized

……” तर होणार नेरळ परिसर नाराज , सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्वपरीक्षा “…..

कोण होणार " कर्जत पंचायत समितीचा " सभापती ? .....

भगवान शेठ चंचे यांना ” बक्षीस ” की , घरातील वारसदार ? ” राष्ट्रवादीचे ” भवितव्य पणाला……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत पंचायत समितीचा कोण होणार सभापती ? यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ” सत्वपरीक्षा ” अवलंबून असून पक्ष श्रेष्ठी तथा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या होणाऱ्या शिक्कामोर्तब वर कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे पुढील ” भवितव्य ” अवलंबून असून नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण असलेल्या सभापतीचा प्रमुख दावेदार हे नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ” भगवान शेठ चंचे ” हेच असल्याने त्यांनी ह्या अगोदर पासून आखलेल्या रणरितीवरून दिसून येत आहे . शिवाय त्यांच्या निवडून आल्यावर आनंदातून दिसून येत आहे . मात्र त्यांना जर ” सभापती ” पद मिळाले नाही तर राष्ट्रवादीच्या पुढील भवितव्याला नक्कीच ” ग्रहण ” लागणार , याची शक्यता राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. 

          ” भगवान शेठ चंचे ” हे नाव कर्जत तालुक्यात एक महत्त्वाची आसामी म्हणून बघितले जाते . नेरळ परिसरात त्यांचा खूप मोठा आदबिने दबदबा आहे . आगरी समाजाचे ते प्रमुख नेते असल्याने राजकीय वर्तुळात त्यांचे खूप मोठे नाव आहे . रायगडचे धुरंधर नेते ” सुनीलजी तटकरे ” यांचे निकटवर्तीय तर तत्कालीन माजी आमदार ” सुरेश भाऊ लाड ” यांच्या मुशीत ते घडलेले आहेत . आता जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ घारे ” यांच्या ” किचन कॅबिनेट ” मधील विश्वासू नेते आहेत . अन्यायावर प्रतिकार करण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने नेरळ परिसरात त्यांच्या कार्यामुळे ते ” सरपंच ” पदी राहून उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते नेरळ परिसरातील ” खूप मोठी ताकद ” असून आता होणाऱ्या पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत त्यांना अग्रगण्य बघून ओबीसी समाजाचे तथा आगरी समूहाचे नेते म्हणून त्यांची निवड सभापती पदी केली नाही , तर आगरी समाजासहित त्यांचा चाहता वर्ग राष्ट्रवादीवर तथा प्रदेश अध्यक्ष ” सुनीलजी तटकरे व जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे ” यांच्यावर नाराज होवून भविष्यात कर्जत मतदार संघाच्या राजकारणात राष्ट्रवादीला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार , अशी राजकीय गोटात शक्यता वर्तविण्यात येत आहे . 

         स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक म्हणजे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची निवडणूक आहे , त्यांच्या निवडणुकीत त्यांना निवडून आणून व त्यांना त्यांच्या हक्कासाठी जीव की प्राण देईन , हे वाक्य परिवर्तन विकास आघाडीचे विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांचे वक्तव्य जगजाहीर असल्याने ते या वक्तव्याला साजेसा निर्णय घेतात की कसे ? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे . राष्ट्रवादीच्या पक्ष श्रेष्ठींना कार्यकर्त्यांची योग्य बाजू मांडणे , सांगणे , हे त्यांचे कर्तव्य असल्याने , ते आता कुठली भूमिका घेतात ? व पक्ष कार्यकर्त्यांना त्यांच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेला जीव देणाऱ्यांना बक्षीस देतात की , आता सभापतीच्या निवडणुकीत घरातील वारसदार देवून कार्यकर्त्यांना नाराज करतात ? याकडे उद्याच्या सभापती पदाच्या शिक्का मोर्तबाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे . मात्र ” भगवान शेठ चंचे ” यांना नाराज करून चालणार नसून , उद्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे पुढील विधानसभेच्या निवडणुकीतील गणिते व भविष्यातील बहुसंख्य हित अवलंबून असून पक्ष श्रेष्ठी काय निर्णय घेतात , हे पाहण्यास मिळणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!