Uncategorized

…..” रमजान इस्लाम धर्मातील एक पवित्र स्तंभ “……

कर्जतमध्ये सर्व हिंदू - मुस्लिम धर्माचे " सलोख्याचे " दर्शन !

सर्वधर्म समभावाचे प्रतीक ” नदीम भाई खान ” यांच्या कडून ” रमजान रोझा ” निमित्त सर्वांना शुभेच्छा …..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

रोझा पकडणे (उपवास) हा इस्लाम धर्मातील एक महत्त्वाचा व ” पवित्र स्तंभ ” आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास ठेवतात, ज्याला ” रोझा ” म्हणतात. या महिन्यात मुस्लिम बांधव , भगिनी , बालके , तरुण – तरुणी , ज्येष्ठ नागरिक ” पहाटे साडेपाच पासून ते सूर्यास्त साडेसहा पर्यंत ” १४ तास अन्न, पाणी, न घेता , साधी थुंकी देखील न गिळता आणि इतर शारीरिक गरजांपासून दूर राहतात. यामुळे आध्यात्मिक शुद्धीकरण व उपवासामुळे आत्म्याची शुद्धी होते आणि ” अल्लाह ” शी जवळीक वाढते. रमजान महिन्यात ” कुरआनचे ” अवतरण झाले, म्हणून या महिन्यात कुरआनचे पठण आणि अभ्यास केला जातो. ” सहर ” म्हणजे पहाटे सूर्योदयापूर्वी जेवण करणे तर ” इफ्तार ” म्हणजे सूर्यास्तानंतर उपवास सोडणे , हा ” नियत ” कर्जतमध्ये अनेक मुस्लिम समाज ” रोझा ” धरून अधिक प्रार्थना करतात, कुरआनचे पठण करतात, आणि दानधर्म करतात. रमजानचा शेवटचा दिवस ईद-उल-फितर म्हणून साजरा केला जातो. 

       गेल्या अनेक वर्षांपासून कर्जतमध्ये मुस्लिम बांधव सर्व धर्मियांशी सलोख्याने – प्रेमाने – मैत्रीपूर्ण रहात असून आजपर्यंत कर्जतच्या इतिहासात याला कुठेच ” गालबोट ” लागले नाही . कर्जत शहरातील ” मशिद ” अश्या ठिकाणी आहे की , ज्या रस्त्यालगतच श्री कपालेश्वर मंदिर आहे , श्री महावीर मंदिर आहे , तर याच रस्त्यावरून वारी , दिंड्या , श्री गणपती विसर्जन होत असताना सर्व धर्मियांनी ” मशिदीचे ” पावित्र्य राखले आहे , आणि हे सलोख्याचे संबंध टिकून राहण्यासाठी कर्जतमध्ये एक चेहरा नेहमीच धडपड करताना दिसत असतो . सर्वधर्म समभावाचे ” प्रतीक ” असलेले , शिवभक्त , शिवसेना पक्षाचा कट्टर मावळा म्हणजे कर्जत शहर संघटक ” नदीम भाई युसुफ खान ” . 

        नदीम भाई , मुस्लिम समाजाचे असूनही ” छत्रपती शिवाजी महाराजांचे ” समता – स्वातंत्र्य – स्वराज्य ” असे प्रखर विचार पुढे घेऊन जाणारा हा शिवभक्त मावळा आपल्या ” महेंद्र गडावरून ” गेली अनेक वर्षे जनतेची सेवा निस्वार्थपणे करत आहे . कार्यालयात आलेल्या प्रत्येकाचे काम येथे होताना दिसत आहे . जाती पातीचे राजकारण विरहित हि सेवा म्हणजे सर्वधर्म समभावाचे मूर्तिमंत ” प्रतीक ” असलेले नदीम भाई ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करून कर्जतमध्ये ” स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ” यांचे विचार पुढे नेण्याचे कार्य ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही प्रकारच्या ” पदाची ” अपेक्षा न ठेवता करत आहेत . कर्जत पोलीस ठाण्यात देखील नदीम भाई यांची ” शांतता मित्र ” म्हणून ओळख आहे . 

         म्हणूनच या पुढेही कर्जतमध्ये हि शांतता अशीच टिकून रहावी म्हणून मुस्लिम धर्माच्या पवित्र ” रमझान ईद ” महिन्याच्या रोझा निमित्त सर्व धर्मातील जनतेला शिवभक्त मावळा शिवसेना शहर संघटक ” नदीम भाई खान ” यांच्या कडून मनपूर्वक शुभेच्छा .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!