Uncategorized

…..” ऊठ मुख्याधिकारी जागा हो – विकास कार्याचा धागा हो “……

बकाल " मच्छी मार्केट व अंधारमय दर्गाह रोड ", नगरसेवक " ॲड रोहित ओसवाल " यांच्यामुळे कामाला गती !

पत्र व्यवहाराने ” मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ” झाले जागे , मात्र नागरिकांत संताप…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषदेचा कारभार तब्बल २ वर्षाने पुन्हा एकदा ” लोकप्रतिनिधींच्या ” हातात आला आहे . या अगोदर मुख्याधिकारी यांच्या अधिकारात असलेल्या कामात कर्मचारी व कामगारांत ” अंकुशाचा ” अभाव असल्याने कामात काही अंशी ” सुस्तपणा ” आला होता . एसी ची थंड हवा , दिमतीला कर्मचारी , खुर्चीचा अधिकार , सेवेचा पाच आकडी पगार , मात्र कर्तव्यात कसूर ? मुख्याधिकारी म्हणजे नगरीचा राजा , मात्र कार्यालयातूनच कारभार हाकणारे , त्यांना कसे कळणार कर्जत नगरीचा बकालपणा , तक्रार अर्ज आले की कामाला दक्ष , असा कारभार चालविणारे , त्यांना कसे कळणार , कुठे काय तक्रारी आहेत त्या ? त्यासाठी खुर्ची सोडून कार्यालय बाहेर पडून नगरीचा फेरफटका मारावा लागतो , जे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी ” रामदास कोकरे ” वागायचे , म्हणूनच आताचे मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” यांच्या कारभाराविषयी नागरिकांत संतप्त चर्चा आहे . 

         

कर्जत नगरीचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मच्छी – मटण मार्केट शेजारी नेहमीच ” दुर्गंधी युक्त ” घाण कचरा पडलेला असतो . शेजारील रहिवासी याबाबतीत वारंवार तक्रारी करत असतात , आता तर दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा ढीग झालेला असताना कार्यात नेहमीच ” देधडक – बेधडक ” असलेले नगरसेवक ” ॲड. रोहित ओसवाल ” यांनी स्थानिक रहिवाश्यांच्या आलेल्या तक्रारीवरून ताबडतोब नगर परिषदेचे मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” यांच्याशी चर्चा करून लागलीच येथील कचरा आरोग्य कर्मचारी यांनी उचलला. मग नागरिक तक्रारी करत होते , याचे काही एक देणे घेणे नव्हते का ? या ठिकाणी नेहमीच कचरा टाकला जातो , याचे ” अपडेट ” मुख्याधिकारी घेत नाहीत का ? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत . त्यावर कायमस्वरूपी तोडगा मुख्याधिकारी का काढत नाहीत ? अश्या दुर्गंधीयुक्त वातावरणात तेथील नागरिक कसे राहतात ? याचा विचार होणे गरजेचे असून त्याठिकाणी ” सीसीटीव्ही कॅमेरे ” लावून कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर ” कारवाई ” होणे , हाच शेवटचा ” अंतिम ” उपाय आहे . 

     

तर दुसरे ठिकाण धार्मिक दृष्टीने खूपच महत्वाचे असताना कर्जत मधील ” दर्गाह ” रस्त्यावर लाखो रुपयांचा दिव्यांचा खर्च केलेला असताना ते निकामी झालेल्या दिव्यांकडे मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होणे म्हणजे मुस्लिम बांधवांचा संताप अनावर होणे आहे . इसुब शाह बाबांच्या दर्गाह वर अनेक भाविक भक्त दर्शनासाठी जात असतात , तर याच ठिकाणी मुस्लिम कब्रस्तान आहे , जीवनातील ” अंतिम ” ठिकाणच्या रस्त्यावर कुणी निधन झाल्यावर याच अंधारमय रस्त्यावरून जावे लागते . तर अंधारात काहीही अनुचित प्रकार घडू शकतो . याचीच तक्रार नगरसेवक ” ॲड रोहित ओसवाल ” यांच्याकडे आल्यावर त्यांनी लागलीच ही बाब मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना लेखी स्वरूपात तक्रार केल्यावर मग मुख्याधिकारी ” झोपेतून जागे ” होऊन त्यांनी अंधारमय रस्ता प्रकाशमान केला , मात्र यासाठीही तक्रारीची वाट बघत बसलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या कारभारा विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला . 

       म्हणूनच ” उठ मुख्याधिकारी जागा हो – विकास कार्याचा धागा हो ” , अशी वेळ आता नागरिकांवर बोलण्याची आली आहे , तर नगरसेवक ” ॲड रोहित ओसवाल ” यांनी केलेल्या ” बेधडक – देधडक ” कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र ” कौतुक ” होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!