…..” कर्जत तालुक्यातील महार गावठाण व महार वतनाच्या जागेवर अनेकांचा कब्जा “…..
आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी मागवली माहिती !

मा. जिल्हाधिकारी व न्यायालयात मागणार दाद…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यात पूर्वापार ब्रिटिश काळापासून अनेक जमिनी ” महार वतनाच्या ” आहेत . या जमिनी त्या काळी शेती नसलेल्या महार समाजाच्या व्यक्तींना शेती करण्यासाठी व मशागत करून उदार निर्वाह करण्यासाठी तर महार गावठाण या रहाण्यासाठी इनामी देण्यात आलेल्या होत्या . मात्र आता अशा महार वतनाच्या व महार गावठाण जागेवर अनेकांनी खरेदी विक्री करून त्यावर कब्जा केला असल्याने आपल्या हक्काच्या जागांना पूर्वीच्या महार तर आताच्या बौद्ध समाजाला मुकावे लागले आहे . या सर्व जागांची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे कार्यतत्पर ” कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड ” यांनी कर्जत तहसील कार्यालयाकडून मागवली असून अशा कब्जा व खरेदी विक्री करणाऱ्या धनदांडग्यांकडून काढून त्यावर कारवाई करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी कार्यालय तर प्रसंगी रितसर मा. कोर्टात अर्ज करून कारवाईची मागणी करणार आहेत .
कर्जत तालुक्यात महार वतनाच्या व महार गावठाणाच्या अनेक जागा आहेत . या जमिनी माहिती नसल्यामुळे गाव – वस्ती – वाडे – पाडे – शहर ठिकाणी महार गावठाण ठिकाणी अनेकांनी कब्जे करून घरे – बंगले बांधले आहेत , तर ब्रिटिश काळात शेती करण्यासाठी दिलेल्या अनेक महार वतनाच्या जागा दलालांमार्फत मुंबईच्या धन दांडग्यांना विकल्या गेल्या आहेत . या माहिती नसलेल्या महार वतनाच्या जागेवर अनेक फॉर्म हाऊस , बंगले उभे राहिले असल्याने मयत झालेल्या महार वंशावळीचा हक्क व अधिकारावर गदा आलेली आहे . अश्या इनामी जागा कुणीही खरेदी करू शकत नसल्याने यांत शासकीय अधिकारी वर्गांच्या साथ असल्याने याविरोधात दाद देखील महसूल विभाग देत नसल्याने अश्या व्यवहारात तहसील कार्यालयातील अनेक अधिकारी वर्गांचे हात देखील अडकले असल्याने या विरोधात आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष दंड थोपटून उभे राहिले असून या बेकायदेशीर कृत्याला विरोध करण्यासाठी सर्व महार वतनाच्या व महार गावठाणाच्या जागेची माहिती मागवली आहे .
सदरची माहिती ही १९६० ते २०२५ पर्यंत असून यांत अनेक जागांचे गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत असून याबाबतीत अनेक पुरावे आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्याकडे असून आपल्या वडिलोपार्जित महार वतनाच्या जागा पुन्हा मिळवण्यासाठी मा. जिल्हाधिकारी ते मा. न्यायालयात ते धाव घेणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून यांत महसूल अधिकारी देखील गुंतले असल्याची चर्चा आहे .




