……” मनसेचे इंजिन धावणार सुसाट , जिल्हाध्यक्ष ” जितेंद्र दादा पाटील ” यांचा स्वबळाचा नारा “…..
कर्जत " थेट नगराध्यक्ष " पदासोबत ईतर जागेवर उमेदवार उभे करून " विजयासाठी " मोर्चे बांधणीला सुरुवात !

मनसे चा निर्णय ” युती – आघाडीला ” ठरणार डोकेदुखी……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत नगर परिषद हद्दीत ” महाराष्ट्र नव निर्माण सेना ” पक्षाध्यक्ष ” राज साहेब ठाकरे ” यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष ” जितेंद्र दादा पाटील ” यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली कार्यरत असताना पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने नागरिकांच्या समस्या सोडवून न्याय देण्यास नेहमीच अग्रेसर राहिला आहे . जेंव्हा जेंव्हा ” प्रश्न जिथं जनतेचा – मार्ग तिथं मनसेचा ” या धोरणाने प्रसंगी खल खट्याक , आंदोलन , मोर्चे , काढून शासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरून अंकुश ठेवून समस्यांचा मार्ग सुकर करणाऱ्या मनसे चा मोठ्या संख्येने ” जनाधार ” असल्याने होऊ घातलेल्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुका ” स्वाभिमानाने ” लढून महिला ओबीसी आरक्षण असलेले नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार व ईतर प्रभागात उमेदवारी लढवून विजयासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असल्याचे मत जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी व्यक्त केले आहे . यासाठी नुकतीच मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली असता चाचपणी करून जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांनी ” स्वबळाचा ” नारा दिला आहे .
कर्जत नगर परिषद हद्दीत पाणी , रस्ते , गटारे , कचरा , वीज , कर पट्टी , बँक कर्जासाठी महिलांसाठी राबविलेले आंदोलने , रोजगार , टोल मुक्ती , खड्डे मुक्त रस्ते , पालिकेतील भ्रष्टाचार , स्थानिक नागरिकांना अन्यायावर न्याय , या प्रश्नांसाठी मनसेचे आंदोलनातून सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलेला ” लढा ” हा कर्जतकर नागरिकांना ज्ञात असल्याने त्यांना या निवडणुकीत मतदारांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे . म्हणूनच नागरिकांच्या भक्कम ” पाठिंब्याच्या ” जोरावर हि निवडणूक आम्ही स्वबळावर लढवून विजयी संपादन करू , असा ठाम विश्वास मनसे पदाधिकारी यांच्या चर्चेतून व्यक्त होताना दिसत आहे .
महाराष्ट्र नव निर्माण सेनेने या कर्जत नगर परिषद निवडणुकीत दमदार एंट्री केली असून त्यांच्या ” स्वबळाच्या नारा ” ने हि निवडणूक अटीतटीची होणार असून थेट ” नगराध्यक्ष ” पद खेचून आणण्यासाठी महायुती व महा आघाडीची जोरदार ” रस्सीखेच ” असताना मनसेची मते नक्कीच ” निर्णायक ” ठरणार आहेत . तर ईतर प्रभागात गुंडगे – भिसेगाव – मुद्रे – आमराई – दहिवली – आकुर्ले – बाजारपेठे – डेक्कन जिमखाना या प्रभागात देखील मनसे आपले उमेदवार उभे करून विजयासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याने नक्कीच जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांची या निवडणुकीतील ” व्यूहरचना ” हि निवडणूक प्रतिष्ठेची करणाऱ्या ” युती – आघाडीला ” विजयाचा उंबरठा पार करण्यास ” डोकेदुखी ठरणार ” , हि काळया दगडावरची रेघ समजली जाणार , हे त्रिवार सत्य आहे .



