……” कर्तृत्ववान आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामणभाई गायकवाड ” व आठवले साहेबांचे सहाय्यक सचिव ” मा. हेमंत रणपिसे साहेब ” यांची मुंबई येथे विविध विषयांवर चर्चा “……

” हेमंत रणपिसे साहेबांकडून हिरामण भाई गायकवाड ” यांचे पंचतारांकित हॉटेल मध्ये भेट व स्वागत !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
मुंबईतील अंधेरी पूर्व येथील आलिशान पंचतारांकित Aurika By Lemon Tree Hotel , सहारा एअरपोर्ट रॉड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे कर्जत तालुका अध्यक्ष मा. हिरामणभाई गायकवाड यांचे Star Maharashtra साप्ताहिकाचे संपादक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रसिद्धीप्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले साहेबांचे सहाय्यक सचिव मा. हेमंत शंकर रणपिसे साहेब यांची भेट विविध सामाजिक – राजकीय व चळवळीच्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी मा. हेमंत शंकर रणपिसे साहेब यांनी पुष्पगुच्छ देऊन कर्तृत्ववान कर्जत ता. अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांचे स्वागत केले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे उपजिल्हाध्यक्ष आयु. तानाजी गायकवाड तसेच Additional Commissioner of Customs मा. विजय मानवतकर साहेब यांचीही उपस्थिती होती.
या सदिच्छा भेटी दरम्यान सामाजिक प्रश्न, समाजकारण आणि राजकारणातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. समाजातील विविध घटकांचे प्रश्न, सामाजिक बांधिलकी तसेच राजकीय क्षेत्रातील घडामोडी यांसंदर्भात मान्यवरांमध्ये विचारविनिमय झाला. कर्जत तालुक्यातील देखील अनेक विषयांवर चर्चा झाली.

पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या भेटीत मान्यवरांनी परस्पर स्नेहभाव जपत संवाद साधला. कर्जत तालुक्यात रिपब्लिकन चळवळीच्या माध्यमातून संघटनात्मक कार्य करणारे तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांचे हेमंत रणपिसे साहेबांनी पुष्पगुच्छ देऊन केलेले स्वागत हा या भेटीतील ” अविस्मरणीय ” विशेष क्षण ठरला.




