दिल्ली NCR

……” रेल जन संवादाच्या माध्यमातून कर्जत रेल्वे प्रशासनाचा पळकुटेपणा “……

कुठलीच ” पूर्व सूचना ” न दिल्याने कर्जतकर रेल्वे प्रवाशांत संताप ! 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

रेल्वे प्रशासनाने रेल्वेत असलेल्या सुविधा अधिक मजबूत होण्यासाठी व नवीन असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आज पूर्ण राज्यात ” रेल जन संवाद ” हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामाध्यमातून कर्जत रेल्वे स्थानकावर देखील स्टेशन प्रबंधक व इतर अधिकारी वर्ग प्रवाशांच्या समस्या व सूचना लिहून घेण्यासाठी टेबल लावून बसले होते. मात्र या उपक्रमाची येथील कर्जत रेल्वे प्रवासी संघटना , रेल्वे प्रवासी , कर्जतकर नागरिक व रेल्वे बोर्ड सदस्य यांना कुठलीच सूचना , साधी कल्पना सोशल मीडियावर किंवा अगोदर सांगितले नसल्याने प्रवाशांनी या उपक्रमाबाबत संताप व्यक्त केला. येथील गेली ६ वर्षे असलेल्या कोरोना नंतरच्या रेल्वे समस्या जास्तीतजास्त नोंदवता आल्या नसल्यानेच या उपक्रमाचा खेद व्यक्त करण्यात आला.

          गेली ६ वर्षे रेल्वे मेल गाड्यांचा असलेला थांबा , बंद केलेल्या गाड्या , रेल्वे स्थानकाची दुरावस्था , तिकीट खिडक्यांची असुरक्षितता , स्थानकावरील अस्वच्छता , भटक्या कुत्र्यांचा वावर , वाढत चाललेल्या गर्दीमुळे जादा लोकल गाड्या नसणे , महिलांच्या डब्यात वाढ , स्थानकावर येणाऱ्या गाड्यांचे अनियमितपणा , रेल्वे पुलाच्या अगोदर लोकल , मेल गाड्यांना थांबवणे , स्थानकावर मध्यभागी १ नंबर स्थानकावरून ३ नंबर स्थानकावर जाण्यास पूल , ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था , अपंग व रुग्णांना ने आण करण्यासाठी असुविधा , कर्जत रेल्वे स्थानकाला आधुनिक बनवणे , पुण्यावरून येताना कर्जत थांबा नसल्याने प्रवाश्यांना होणारा जीवघेणा त्रास ,  कर्जत – पनवेल लोकल सेवा लवकरच सुरू करणे , भिसेगाव – कर्जत भुयारी मार्ग बनविणे , अश्या विविध समस्या गेली ६ वर्षे कर्जतकर प्रवासी करत असून देखील रेल्वे प्रशासनाला त्या सोडविता आल्या नसल्याने आजही कर्जत रेल्वे स्थानकावर या समस्या पाहण्यास मिळत आहेत.

           फक्त आलेला उपक्रम येथील स्टेशन प्रबंधक राबविण्याचा कार्यक्रम करून रेल्वे प्रवासी वर्गाची धूळफेक करत असून , लिहून घेतलेल्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवाव्या , अशी संतापजनक मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंजकर , पत्रकार विजय मांडे , सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल , रेल्वे बोर्डाचे सदस्य नीतिन परमार , प्रशांत उगले , व इतर कर्जतकर नागरिकांनी लेखी तक्रार करून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!