……” जिल्हा नियोजन समिती बैठकीत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची नागरी सुविधांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका “……
कर्जत - खालापूरच्या " जलजीवन मिशन सह रस्ते व वीज " विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा !

अलिबाग येथे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ” नाम. भरतशेठ गोगावले ” यांची प्रमुख उपस्थिती…….
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत खालापूर मतदार संघातील नागरी समस्या सोडवण्यास व मतदारांना सोई – सुविधा देण्यास नेहमीच तत्परतेची भूमिका वरिष्ठ पातळीवर मांडून त्या सोडविण्यासाठी झटणारे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीत नागरी सुविधांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. कर्जत – खालापूरच्या जलजीवन मिशन सह रस्ते व वीज विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपस्थित राहत त्यांनी केली. हि चर्चा कर्जत व खालापूर तालुक्याच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होती.

खालापूर तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यासोबतच तालुक्यातील रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत व पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मांडून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण चर्चा केली.
कर्जत व खालापूर तालुक्यांतील विकासकामांना अधिक गती मिळावी, नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता व्हावी आणि विविध विकासकामांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर भर देण्यात आला. पालकमंत्री मा. ना. श्री. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील , असा विश्वास त्यांना आहे.

या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी, आमदार रविशेठ पाटील, जिल्हाधिकारी श्री. किसनजी जावळे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्नेहा भोसले, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




