…….” आजाद समाज पार्टी (कांशीराम) , दलित पँथर , रिपब्लिकन सेना या पक्ष व संघटनांचा दहा दिवसांच्या अल्टिमेटमचा दणका यशस्वी “……
खांडस येथील " जय जगदंबा विद्यालयातील " समस्या मार्गी !

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ” संघटनांचा ” आक्रमक पाठपुरावा……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील खांडस गावातील ” जय जगदंबा माध्यमिक विद्यालय “, येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर आजाद समाज पार्टी (कांशीराम) कर्जत तालुका अध्यक्ष प्रशांत भाई जाधव, दलित पँथर कोकण प्रदेश अध्यक्ष आशिष भाई खंडागळे, आजाद समाज पार्टी (कांशीराम) रायगड जिल्हा महासचिव रोहित भाई जाधव आणि रिपब्लिकन सेना कर्जत तालुका अध्यक्ष सिद्धार्थ भाई जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शाळेची नुकतीच पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेत शाळा प्रशासनाला ” जाब ” विचारण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी शाळा प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

हा इशारा दिला अन् परिणाम दिसला , असे चित्र येथे पहाण्यास मिळाले आहे. संघटनांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत शाळेतील शिक्षकांनी ” सकारात्मक ” भूमिका घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांबाबत सुधारणा करण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेत शाळेचे मुख्याध्यापक ” रामेश्वर रोडगे ” यांनीही सकारात्मक भूमिका घेत प्रश्नांच्या निवारणासाठी सहकार्य केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही केली.


यानंतर केलेल्या पाहणीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता, स्वच्छता, शिक्षणाचे वातावरण आणि मूलभूत सुविधांबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून वेळेत उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी आजाद समाज पार्टी (कांशीराम) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा कोकण प्रभारी ॲड. सुमित साबळे, रायगड प्रभारी सिद्धार्थ सदावर्ते, रायगड जिल्हा अध्यक्ष सचिन भालेराव, दलित पॅंथर कोकण प्रदेशाध्यक्ष आशिष भाई खंडागले, प्रदेश सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस ॲड . सुरज पंडित , रायगड जिल्हा महासचिव रोहित भाई जाधव, कर्जत तालुका अध्यक्ष प्रशांत भाई जाधव , रिपब्लिकन सेना कर्जत तालुका अध्यक्ष सिद्धार्थ भाई जाधव, खांडस शाखा प्रमुख नितीन जाधव, कळंब वॉर्ड प्रमुख मोहन जाधव,अजय हिरे,रोहीत सरावते यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि चांगले शैक्षणिक वातावरण मिळणे आवश्यक आहे. शाळेने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे यावेळी स्वागत करण्यात आले असून, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत आवश्यक ते सहकार्य आणि पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आली तर ” संघर्ष अटळ ” असल्याचे सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण घेता यावे , व पुढील शिक्षण घेण्यासाठी योग्य दिशा मिळावी , म्हणून राजिप शाळांचा व विद्यालयाचा दर्जा व सोई सुविधा चांगल्या असणे व दर्जेदार शिक्षण मिळणे हि काळाची गरज ओळखून या शाळेबाबत प्रश्न उपस्थित केला, यासाठी पाठपुरावा केला आणि त्यावर सकारात्मक तोडगा निघाला , हीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या ” प्रयत्नांची फलश्रुती ” असल्याचे, याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.




