टॉप न्यूज़

……” कर्जतची फातिमा माऊली – अवर लेडी ऑफ फातिमा तीर्थस्थानचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा “…..

हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील ” भाविक – भक्तांची ” दर्शनासाठी गर्दी ! 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव रेल्वे गेट शेजारी असलेल्या कर्जतची ” फातिमा माऊली – अवर लेडी ऑफ फातिमा ” तीर्थस्थानचा ९० वा उत्सव रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा संपन्न झाला . १३ ऑक्टोबर रोजी फातिमा मातेने पोर्तुगाल मधील ३ लहान मुलांना दिलेल्या ६ व्या आणि शेवटच्या भेटीची ” स्मृती ” जगभर मोठ्या जल्लोषात साजरी होताना ” फातिमा मातेचा ” सण ह्या वर्षी कर्जत येथे देखील हजारो भाविक – भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला.

          यावेळी फादर डेनिस घोन्सलवीस, फा. कालिस्ट्स फर्नांडिस, फा. क्लारेन्स सिकवेरा, फा. ऍंथोनी फर्नांडिस, फा. लेसली मालिया, फा. काजिटन आणि फातिमा तीर्थक्षेत्राचे प्रमुख धर्मगुरु फादर ज्यो डिमेलो ह्या सर्वांनी पवित्र मिस्साबली मध्ये सहभाग घेऊन भाविकांना प्रबोधनपर प्रवचन दिले.

           बुधवार, १४ ऑक्टोबर तें शुक्रवार १६ ऑक्टोबर फादर बेंजामीन अल्फानसो ह्यांनी धर्मग्रामाच्या वार्षिक सणाच्या तयारीसाठी लोकांची आध्यात्मिक तयारी केली. शनिवारी १७ ऑक्टोबरला रोमवरून फातिमा मातेच्या पुतळ्याचे थाटामाटात स्वागत करण्यात आले. रविवारी मुख्य सणाच्या दिवशी सकाळी ७ वाजता मराठी मिस्सा, ८ वाजता कोंकणी मिस्सा, ९ वाजता मराठी मिस्सा, १० वाजता इंग्रजी मिस्सा, ११ वाजता फातिमा मातेच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता सणाची मुख्य मिस्सा आर्चबिशप जॉन रॉड्रीग्ज ह्यांनी साजरी केली. त्यांनी भाविकांना अतिशय सुंदर आणि बोधपर असे आध्यात्मिक मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत पवित्र वेदीवर प्रमुख धर्मगरू फा. ज्यो डिमेलो, फा. डेनिस घोन्सलवीस, फा. मॅथू, फा. बोनाविंचूर आदींनी सहभाग घेऊन भाविकांना आशीर्वाद दिले. फादर ज्यो डिमेलो ह्यांनी आर्च बिशपांचे विशेष आभार मानले. याप्रसंगी ॲड. ऍंथोनी डिमेलो यांनी धर्मग्रामाच्या वतीने बिशपांचे आणि सर्व भाविकांचे आभार मानले.

         कर्जतच्या इतिहासात पहिल्यांदा ह्या वर्षी दुपारी २ वाजता भाविकासाठी तामिळ भाषेत आणि संध्याकाळी ४ वाजता मल्ल्यालम भाषेत मिस्सा साजरी करण्यात आली. दुपारी सर्वांना स्नेहभोजन करण्यात आले. अश्या प्रकारे , कर्जत येथे फातिमा मातेचा ९१ वार्षिक सोहळा , आणि तीर्थस्थान मंदिराचा ९० वा वर्धापन दिवस खूप थाटामाटात साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!