……” जिल्हाधिकारी साहेब ” खुर्ची ” सोडा , कर्जत तालुक्यातील रस्त्यावर या , रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत ” रमेश दादा कदम ” यांचे अनोखे आंदोलन “…….
कर्जतमध्ये " श्रीगणेश बाप्पांची " मूर्ती मांडीवर घेऊन बेमुदत उपोषण !

” जिल्हाधिकाऱ्यांची ” बेजबाबदार वृत्तीमुळे कर्जत तालुक्यात ” पोलीस मित्र संघटनेचे ” हे ४२ वे संतप्त आंदोलन…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ” किशन जावळे ” यांनी आपली वातानुकूलित ” खुर्ची ” सोडून आता कर्जत तालुक्यातील सर्व विभागांच्या रस्त्यावर पडलेल्या बेसुमार खड्ड्यांबाबत येथे रस्त्यावर उतरून पाहणी करण्याची गरज येवून ठेपली आहे . श्रीगणेशोत्सव पूर्वी सर्व विभागांच्या अंतर्गत येणारे रस्ते तातडीने सुस्थितीत करून द्यावे , या मागणीसाठी ” पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम ” यांनी ” श्री गणेश मूर्ती ” मांडीवर घेऊन अनोखे आमरण उपोषण सुरू केले आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या ” बुझगावण्या व बघ्याची ” भूमिकेमुळेच पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून रमेश दादा कदम यांचे विविध विषयांवर नागरिकांच्या समस्या घेऊन हे ” ४२ वे ” आमरण उपोषण आहे. मात्र संतापजनक बाब म्हणजे या इतक्या वेळी केलेल्या आमरण उपोषणास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी एकदाही भेट कर्जतमध्ये दिली नाही , आणि त्यांच्या या बेजबाबदार कारभारामुळेच येथील अधिकारी देखील गोर गरीब नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत. जिथे जिल्हाधिकाऱ्यांचा वचक नाही , म्हणूनच हे अधिकारी वर्ग कुणाला जुमानत नाहीत . म्हणूनच कर्जत तालुक्यात रमेश दादा कदम यांनी शासकीय अधिकारी वर्गाला ” चपराक ” बसेल असे हे आंदोलन सुरू केले आहे.

कर्जत तालुक्यातील कर्जत शहर , तसेच ग्रामीण भागातील सर्व हद्दीत , व इतर अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशा चाळन झाली आहे , म्हणूनच रस्त्यांवरील खड्डे गणेशोत्सव सणापूर्वी तातडीने भरावे , यासाठी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग , राजिप बांधकाम विभाग , कर्जत नगर परिषद , MMRDC , MSRDC , जिल्हाधिकारी , कर्जत तहसीलदार , मुख्यमंत्री सहित सर्वांना निवेदन देऊन सावध केले होते . मात्र कुणीच याची दखल घेतली नाही. आणि म्हणूनच रमेश दादा कदम यांना हे ” अनोखे आंदोलन ” सोमवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२६ पासून कर्जत शहरातील ” श्रीराम पुलावर ” करावे लागले. १ महिन्यापूर्वी या रस्त्याचे लोकार्पण झाले होते , मात्र झालेल्या रस्त्याच्या चाळणीमुळे पडलेल्या खड्ड्यातून वाहनधारकांना वाट काढताना खूपच त्रास होत आहे , तसेच स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रवासी पूर्णपणे त्रस्त झाले आहेत. असेच सर्व तालुक्यात रस्त्यांची अवस्था झाली आहे.
यापूर्वी देखील रमेश दादा कदम यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी थेट खड्ड्यांत बसून आंदोलन केले होते. मात्र जिल्हाधिकारी किशन जावळे त्यावेळी देखील , यापूर्वी प्रमाणेच या त्यांच्या उपोषणाला गांभीर्याने घेतले नाही , की कुठल्याही अधिकारी वर्गावर कठोर कारवाई केली नाही. आणि म्हणूनच या रस्त्यांसंबंधी हे मुजोर अधिकारी पूर्वी उपोषणावेळी दिलेल्या लेखी आश्वासनाला ” केराची टोपली ” दाखवून पुन्हा उपोषण करण्यास मजबूर करत आहेत.
कर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए आणि जिल्हा परिषद या सर्व बांधकाम विभागांच्या अखत्यारीत असलेले सर्व रस्त्यांची जबाबदारी हि त्यांचीच असल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची व यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्वतः आपली वातानुकूलित खुर्ची सोडून पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम बाप्पाला घेऊन ” जलसमाधी ” घेण्या अगोदर कर्जतच्या रस्त्यावर या , अशी संतप्त मागणी आता नागरिकांत होऊ लागली आहे.




