दिल्ली NCR

……” कर्जतच्या राजकारणाला शाळकरी मुलींनी दाखवलेला आरसा फुटला “…..

खांडपे - कोंदिवडे रस्त्याची दुरवस्था - रस्ता पुन्हा जैसे थे !

प्रशासन आणि नेते गायब ? रमेश दादा कदम यांची ” श्री गणपती उत्सवापूर्वी ” आंदोलनाची तयारी……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत – खांडपे – कोंदिवडे रस्ता……या रस्त्याने गजबचा ” चमत्कार ” केला. तीन शाळकरी मुलींच्या एक व्हिडिओनी संपूर्ण महाराष्ट्र ” हादरला ” होता. खांडपे – कोंदिवडे रस्त्यावरील खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या त्या चिमुकल्या ” शाळकरी मुलींनी ” हातात मोबाईल घेऊन रिपोर्टरची भूमिका बजावली आणि सत्य समोर आणलं. तो व्हिडिओ वाऱ्यासारखा महाराष्ट्रभर व्हायरल झाला. परिणाम काय झाला ? झोपेचं सोंग घेतलेली प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. लोकप्रतिनिधी धावत आले. तात्काळ त्या एकाच रस्त्याची ” मलमपट्टी ” केली गेली , खड्डे बुजवले. फोटो , सत्कार , कौतुकाचा वर्षाव शाळकरी मुलींवर झाला…. मनसे , ठाकरे सेना, राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचे नेते… सगळे त्या शाळकरी मुलींचा सत्कार करायला रांगेत उभे होते. 

            काही दिवस गेले , मात्र आता प्रश्न असा आहे , प्रशासन व ते सगळे नेते आता गेले कुठे ? कारण तोच खांडपे – कोंदिवडे रस्ता आज पुन्हा मृत्यूचा सापळा बनला आहे. सर्वत्र खड्डेच – खड्डे , चिखल , पाणी आणि अपघाताला आमंत्रण , पण आता त्या रस्त्याकडे ढुंकूनही कोणी बघायला तयार नाही…

हा रस्ता येतो बीड जिल्हा परिषद गटात. हा तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. कर्जत पंचायत समिती वर यांचाच सभापती , यांचीच सत्ता , जिल्हा परिषदेवर ही सत्ता तुमची, सभापती तुमचे, मग रस्ता खड्डेमय का ? हा सवाल कर्जतकर जनता विचारतेय….आणि यासाठीच गणपती उत्सवापूर्वी हा रस्ता सुस्थितीत न झाल्यास गणपती बाप्पाला घेऊन खड्ड्यात बसण्याची व नदी पात्रात जलसमाधी घेण्याची वेळ आली असून लवकरच क्रोध आंदोलन करण्यात येणार असल्याचे , पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

         कर्जत तालुक्यातील ही अवस्था फक्त एका रस्त्याची नाही.तालुक्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. या सर्व रस्त्यांची पोलीस मित्र संघटनेने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. सर्व बांधकाम विभागांना – जिल्हा परिषद , सार्वजनिक बांधकाम, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार या सगळ्यांना निवेदनं दिली. इशारा दिला – ” गणपती उत्सव सुरू होण्यापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा, नाहीतर बाप्पाला मांडीवर घेऊन खड्ड्यात बसून आंदोलन करू , नदी पात्रात बाप्पाला घेऊन जलसमाधी घेऊ.”

         श्री गणपती उत्सव अवघ्या ८-१० दिवसांवर आला आहे , पण एकही विभाग कामाला लागायला तयार नाही. राजिप बांधकाम विभागाने थोडीफार सुरुवात केली आहे , पण तेही काम समाधानकारक नाही. म्हणूनच सोमवार दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी ” श्रीराम पुलावर ” पोलीस मित्र संघटना गणपती बाप्पाला मांडीवर घेऊन रस्त्यावरच ” ठिय्या आंदोलन ” करणार आहे , आणि तरीही दखल नाही घेतली , तर बाप्पाला मांडीवर घेऊन नदीपात्रात जलसमाधी घेण्याचा आक्रोश पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!