……” कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून ” सशक्त महिला – समृध्द कर्जत ” योजने अंतर्गत ” एकल महिला सर्वेक्षण २०२६ ” ला सुरुवात “…..
" एकल महिलांच्या कल्याणासाठी " हि योजना महत्वाची !

संबंधित महिलांनी याचा लाभ घ्यावा , मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” यांचे आवाहन……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” स्त्री सक्षमीकरणासाठी व एकल महिलांच्या कल्याणासाठी ” राज्य सरकारने जाहीर केलेल्या ” एकल महिला सर्वेक्षण २०२६ ” ला कर्जत नगर परिषद हद्दीत सर्व प्रभागात सुरुवात झाली असून , या योजने अंतर्गत असलेल्या सर्व सोई – सुविधा – तरतुदींचा लाभ एकल महिलांच्या कल्याणासाठी होणार आहे.
यामध्ये ज्या महिला विधवा ( पतीचे निधन झालेल्या महिला ) आहेत , घटस्फोटीत ( पतीकडून कायदेशीररित्या विभक्त झालेल्या महिला ) , परित्यक्ता ( पतीकडून सोडचिट्टी न घेता किंवा त्याग केलेल्या महिला ) , अविवाहित ( लग्न न केलेल्या व वयाने मोठ्या असणाऱ्या एकटया महिला, दिव्यांग किंवा एकटया जीवन जगणाऱ्या महिला ) अश्या महिलांचा सर्वेक्षण या योजने अंतर्गत होणार आहे.
सदर सर्वेक्षणाबाबत कर्जत नगर परिषदेमध्ये नागरी सुविधा केंद्रात फॉर्म उपलब्ध आहेत , तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ,नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे , उपनगराध्यक्ष संतोष दादा पाटील , सौ. हर्षाली गायकवाड – महिला व बालकल्याण सभापती , सौ. अंजली कडू – महिला व बालकल्याण उपसभापती , महेंद्र बबन चंदन – गटनेता , संकेत जनार्दन भासे – विरोधी पक्ष नेते , यांनी व नगर परिषदेच्या सर्व नगरसेवक – नगरसेविकांनी केले आहे.
” सशक्त महिला – समृध्द कर्जत ” होण्यासाठी कर्जत नगर परिषदेचे शशांक तळवटकर ( विभाग प्रमुख ) मो. 9029681813 यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधण्यास सांगितले आहे.




