…..” झुकेगा नहीं – रमेश दादा कदम तू एकटा बास , कर्जतमध्ये २२ व्या दिवशी साखळी उपोषण यशस्वी “…….
कर्जत तालुक्यातील " भ्रष्टाचार व बेकायदेशीर " कामांची पोलखोल !

” पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम ” यांचे ४० वे उपोषण ” जिल्हाधिकारी ” यांच्या सूचनेनुसार अखेर स्थगित……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत तालुक्यातील ” भ्रष्टाचार व बेकायदेशीर ” कामांची पोलखोल करण्यासाठी अनेक विषय घेऊन ” पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश दादा कदम ” हे २५ जून पासून कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे गेले ” २२ दिवस उपोषण ” करत होते . अखेर ” अन्नत्याग व उल्हास नदीत जल समाधी ” घेण्याचा निर्वाणीचा निर्णय घेतल्यावर रायगड जिल्हाधिकारी ” किशन जावळे ” यांनी याबाबत दखल घेऊन तालुक्यातील अधिकारी वर्गांची कानउघडणी केल्यावर पुन्हा एकदा आश्वासन देऊन लवकरच या प्रकरणांवर कारवाई केली जाईल , असा आदेश काढल्याने रमेश दादा कदम यांनी आपले उपोषण आज १८ जुलै २०२६ रोजी स्थगित केले . या उपोषणास कर्जत तालुक्यातील सुज्ञ नागरिक , पत्रकार , सामाजिक – धार्मिक – राजकीय व ईतर सर्व संघटनांचा भरभरून पाठिंबा व आशिर्वाद मिळाला , आणि म्हणूनच पोलीस मित्र संघटनेचे हे उपोषण यशस्वी झाले.

मा.किशन जावळे जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार आज शनिवार दिनांक १८ जुलै २०२६ रोजी प्रकाश संकपाळ – उपविभागीय अधिकारी कर्जत, धनंजय जाधव – तहसीलदार कर्जत ,यांनी पाटबंधारे उप विभाग उप अभियंता कर्जत, कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या समवेत उपोषण दरम्यानच्या मागण्या संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते . त्या बैठकीत सर्व विभागीय अधिकारी यांनी साकारात्मक चर्चा केली व सर्व मागण्या मान्य करून सोमवारी लेखी आश्वासन देण्याचे मान्य केले , त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले , मात्र आश्वासनाची पूर्तता न केल्यास स्थगित उपोषण पुन्हा सुरू करण्यात येणार , असा इशारा देखील रमेश दादा कदम यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिला आहे .

या उपोषण दरम्यान उपजिल्हा रुग्णालय येथील गलथान व मनमानी कारभारा विरोधातील उपोषणास यश आले व ” वैद्यकीय अधिक्षक म्हस्कर ” यांची बदली झाली व त्यांची फेर चौकशी सुरू आहे.

पाटबंधारे उप विभाग उप अभियंता यांच्या अखत्यारीत असलेल्या नदी – नाले – कालव्यातील अनधिकृत बांधकामांवर व बेकायदेशीर माती भरावावर कायदेशीर कारवाई करण्यात येणे कामी १ महिन्यात संबंधित विभागीय अधिकारी यांची कमिटी स्थापन करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल , असे लेखी आश्वासन पत्र दिले.

कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडील सर्व मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केले आहे , त्या संदर्भातील पत्र सोमवारी देण्यात येणार आहेत.


त्याच प्रमाणे आदिवासी खातेदारांच्या बेकायदेशीर जमीनी हस्तांतरण प्रकरणात तालुक्यातील सर्व आदिवासी खातेदारांच्या बेकायदेशीर हस्तांतरण झालेल्या जमीनींची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल , असे आश्वासन दिले आहे , ते सोमवारी आश्वासन पत्र देण्यात येणार आहे.

अशा प्रकारे तीन ही विभागाने सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे , त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले . पुढील काळात आश्वासनाची पुर्तता न केल्यास ” स्थगित उपोषण ” पुन्हा सुरू करण्यात येईल , जोपर्यंत आश्वासनाची पूर्तता करत नाही , तोपर्यंत उपोषण करत राहु , असा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला , तर कर्जत तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व त्यांच्या राजकीय नेत्यांचा हवा तसा पाठिंबा मिळाला नाही , म्हणूनच आम्हाला २२ दिवस साखळी उपोषण करावे लागले , याची खंत त्यांनी याप्रसंगी बोलून दाखवली .
मात्र लढाई अजुन संपली नाही , कारण अजून आम्ही जिंकलो नाही , त्यामुळे मागे हटणार नाही , गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहु , असा विश्वास कर्जत तालुक्यातील भ्रष्टाचारी व बेकायदेशीर कामांची ” पोलखोल ” उघड करण्यास आम्ही सदैव तत्पर राहू , असे मत रमेश शांताराम कदम – सामाजिक कार्यकर्ता, तथा प्रदेश उपाध्यक्ष, पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत, यांनी उपोषण स्थगित करताना व्यक्त केले .




