Uncategorizedदिल्ली NCR

…..” कर्जत नगरीतील अस्ताव्यस्त कचरा व डबडबशाही विरोधात शहर शिवसेना व नगरसेवक संतप्त “…..

पुढील दहा दिवसात योग्य कार्यवाही न केल्यास " तीव्र आंदोलन " छेडणार !

” नगराध्यक्ष तुमच्या दारी – कार्यक्रम भारी – तरी शहरात कचऱ्याच्या तक्रारी ” शहर प्रमुख ” अभिषेक सुर्वे ” यांनी विचारला प्रशासनाला जाब……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषदेचा कारभार सत्ताधारी ” परिवर्तन विकास आघाडी ” चे नगराध्यक्षांकडे येवून , व सर्व सभापती , निवड होऊन सहा महिने होऊनही शहरातील कामकाजाची घडी अद्यापि बसली नाही , म्हणूनच कर्जत नगरीतील अस्ताव्यस्त कचरा व डबडबशाही पसरली असल्याचे चित्र सर्वत्र आहे . ” नगराध्यक्ष तुमच्या दारी – कार्यक्रम भारी – तरी शहरात कचऱ्याच्या तक्रारी ” असा संतप्त सवाल शिवसेनेचे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी शिवसेना भाजपचे सर्व नगरसेवक घेऊन आज कर्जत नगर परिषद ” संतप्त ” होत डोक्यावर घेतली . विरोधी पक्षातील शिवसेना भाजपा नगरसेवकांच्या प्रभागातील स्वच्छता व पडलेला कचरा सांगूनही उचलला जात नसेल तर प्रशासनाच्या व सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा संतप्त इशारा शिवसेना कर्जत शहर प्रमुख ” अभिषेक सुर्वे ” यांनी झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आज गुरुवार दिनांक २५ जून २०२६ रोजी कचऱ्याचे फोटो व निवेदना मार्फत दिला .

           शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारे साफ न होणे, साचलेला कचरा तसाच असणे , अस्वच्छ दूषित वातावरण , डासांची उत्पत्ती , फोडलेले रस्ते , यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विरोधी पक्षांच्या नगरसेवकांच्या प्रभागात कामे होत नसल्याने नागरिकांना काय उत्तरे द्यायची ? असा प्रश्न यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केला . यावेळी कर्जत शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कर्जत नगरपरिषद कार्यालयात भेट देऊन मुख्याधिकारी श्री. तानाजी चव्हाण यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कारणास्तव ते कार्यालयाबाहेर असल्याने कर्जत नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री. रवी लाड यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

         याप्रसंगी शिवसेनेचे गटनेते – नगरसेवक संकेत भासे यांच्या मार्गदर्शनाखाली , शिवसेना कर्जत शहरप्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली , नगरपरिषद प्रशासनाला तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे , यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, कर्जत शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी शिवसेना सदैव जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध आहे. दहा दिवसांत कर्जत शहरात स्वच्छतेचा प्रश्न निकाली न काढल्यास याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा याप्रसंगी कर्जत नगर परिषद प्रशासनाला देण्यात आला .

           याप्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक वैभव सुरावकर, नगरसेवक रोहित ओसवाल, नगरसेवक विजय हजारे, भाजप नगरसेवक रामदास गायकवाड, नगरसेवक किशोर कदम, नगरसेविका सौ. कोयल कन्हेरीकर, नगरसेविका सौ. अरुणा वायकर, नगरसेविका सौ. जान्हवी देवघरे, शहरप्रमुख संजय मोहिते, उपशहरप्रमुख दिनेश कडू, कोतवाल नगर विभाग अधिकारी प्रफुल्ल शिगवण, उपशहरप्रमुख मोहन भोईर, महिला शहरप्रमुख सौ. कोमल म्हामुनकर, उपशहरप्रमुख सौ. राजश्री आचरेकर, शहरसंपर्क प्रमुख सौ. सपना गवळी तसेच स्वप्निल जाधव, सौरभ केदारी, कुणाल गुप्ता, सुयश मेंढरे, रमाकांत जाधव, रोहित बाफना, संदीप कर्णुक, दर्शन वायकर आणि तेजस गायकर आदी पदाधिकारी , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!