दिल्ली NCR

…..” पावणे दोन वर्षे वाट बघून अखेर पालकमंत्री पद मिळाले , या मतदार संघात मोठा निधी देणार – नामदार भरत शेठ गोगावले

नागरी सत्काराला भारावून जात ” पालकमंत्री भरतशेठ गोगावले ” यांनी आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांचा केला सत्कार ! 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी कायम व मजबूत साथ देत गेली पावणे दोन वर्षे वाट पहावी लागलेले पालकमंत्री पद हे , छत्रपतींच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या राजधानी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या महाडचे आमदार भरत शेठ गोगावले यांची नियुक्ती होऊन ते अखेर नामदार होऊन या जिल्ह्याचे ” पालकमंत्री ” झाल्याने त्यांचा भव्य नागरी सत्कार शिवतीर्थ पोसरी येथे आयोजित केला होता. याप्रसंगी या सोहळ्यास मोठ्या संख्येने शिवसेना , भाजप , आर पी आय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

         नागरी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित पालकमंत्री मा. ना.श्री. भरतशेठ गोगावले यांनी आपल्या पालकमंत्रीपदासाठी ” ज्यांनी देव पाण्यात ठेवले होते “, त्या सर्वांचा सत्कार सोहळा असल्याचे मिश्कीलपणे सांगितले. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक जनता आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त करत, “ टीका करणाऱ्यांना कामाने , विकास साधून उत्तर देऊ, ” हा एकनाथ शिंदे साहेबांचा विचार असून त्याच पद्धतीने आपण काम करणार असल्याचे सांगितले.

        आम्ही देखील ” त्याग ” केला आहे , आमचा मुलगा व आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मुलीने माघार घेतल्यानेच तुमचा मुलगा विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले व आमदार झाले , हे विसरून चालणार नाही , असे खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता त्यांनी सत्य या सत्कार सोहळ्यात सांगितले. हा मतदार संघ बहुतांश आदिवासी भाग असल्याने या मतदार संघात जास्तीत जास्त निधी देणार , असे आश्वासन नवनिर्वाचित पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले.

         याप्रसंगी मा. आमदार तथा शिवसेना उपनेते मा.श्री.शहाजीबापू पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या लढाईचा उल्लेख करत, गेल्या महिन्याभरात या संघर्षाचा शेवट झाला आणि अखेर श्री.भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळाले. जाणून बुजून दबाव टाकून गोगावले यांना पालकमंत्री पदापासून दूर ठेवले गेले , असेही त्यांनी स्पष्ट केले.

        यावेळी या सत्कार सोहळ्यास व्यासपीठावर मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे , माजी आमदार तथा शिवसेनेचे उपनेते शहाजी बापू पाटील , अलिबागचे आमदार महेंद्र दळवी , कर्जत मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे , जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , संघटक विजय पाटील , विधान सभा संघटक शिवराम बदे , खालापूर सभापती भाई शिंदे , कर्जत ता. प्रमुख सुदाम दादा पवाळी , संघटक संभाजी जगताप , मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , जिल्हा युवा प्रमुख प्रसाद थोरवे , राजिप मा. अध्यक्ष सुरेश दादा टोकरे , मा. नगरसेवक बाळाजी विचारे , माथेरान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी , खोपोली नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे , माजी सभापती तथा युवा ता. प्रमुख अमर मिसाळ , विरोधी पक्ष नेते ॲड संकेत दादा भासे , शहर प्रमुख संजय मोहिते , शिवाजी खारीक , भास्कर दिसले , मा नगरसेवक मोहन औसरमल , संघटक अरुण देशमुख ,

        आर पी आय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड , कोकण कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर संघटक नदीम भाई खान , विभाग प्रमुख गणेश पालकर , सुनील ठाकूर , मा. पंचायत समिती सदस्य मीना थोरवे , भाजप जिल्हा नेते तानाजी चव्हाण , जिल्हा महासचिव दिपक बेहरे , मा. नगराध्यक्ष शरद भाऊ लाड , जिल्हा संघटक राजेश भगत , मा. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , राजिप मा. समाज कल्याण सभापती सुभाष दादा गवळे , मा. सरपंच उत्तम सोनावणे , संघटक दिलीप ताम्हाणे , शिवाजी देशमुख , त्याचप्रमाणे कर्जत – खोपोली – माथेरान – खालापूर न. प. च्या सर्व नगरसेवक – नगरसेविका , शिवसैनिक , युवा सेना , महिला आघाडी मोठ्या संख्येने या अभुतपुर्व सोहळ्यास उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!