……” वीज देशाची – राज्याची संपत्ती त्यामुळे टोरेंट वीज प्रकल्पाला विरोध नाही , मात्र वृक्ष तोड न करता झाडे पुनः रोपण करा , ” भाजप नेते किरण दादा ठाकरे ” यांची सरकारकडे मागणी “……

प्रकल्प हि झाले पाहिजेत – निसर्ग हि वाचला पाहिजे , असा पर्याय निवडा !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
आजच्या काळात ” वीज ” हि खूपच आवश्यक गरज असल्याने विकासात ” क्रांती ” घडवायची असेल तर राज्यात नवनवीन प्रकल्प राबवणे हे गरजेचे आहे , मात्र त्यासाठी इतर देशासारखी टेक्नॉलॉजी वापरून येथील जंगल संपती संपुष्टात न आणता त्याचे संगोपन , जतन आपण वेगळ्या मार्गाने करून प्रकल्प पूर्ण करू शकतो , अशी सरकारकडे मागणी व्यक्त करत भारतीय जनता पक्षाचे मा. विधानसभा अध्यक्ष तथा येथील नेते ” किरण दादा ठाकरे ” यांनी टोरेंट वीज प्रकल्पाबाबत आपली भूमिका व्यक्त करत साई डोंगर परिसरात वृक्ष तोड न करता चीन देशात करत असलेले ” झाडांचे पुनः रोपण ” करून ती झाडे मुळासकट उपटून दुसरीकडे जिवंत ठेवू शकतो , त्यावर पाणी , खत किंवा इतर गोष्टी वापरून टोरेंट कंपनीने ते जतन करावे , अशी मागणी सरकारकडे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी होणाऱ्या धरणातून २५ टक्के पाणी स्थानिकांना कसे मिळेल , यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याची त्यांनी भूमिका मांडली.
राज्यातील सरकारने अटल सेतू , मिसिंग रोड , इतर कर्जत – चौक रस्ते सुस्थितीत करून दळणवळणाची उत्तम सोय केली आहे , यावर भाजप नेते किरण दादा ठाकरे यांनी प्रकाश टाकला. विकास होणे गरजेचे असून आता पाणी व वीज प्रकल्प कर्जत तालुक्यात येत असताना प्रकल्पाच्या ठिकाणी झाडे असल्याने वृक्ष तोड झाल्यास नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात , मात्र त्यावर सरकारने पर्याय उभा करून हजारो झाड वाचवू शकतील , यासाठी वृक्ष तोड न करता पूर्ण झाड बुंध्यापासून उपटून ते कर्जत तालुक्यातील वन विभागांच्या मोकळ्या जागेत ” पुनः रोपण ” करून त्यांचे संगोपन व जतन केल्यास वृक्ष हि वाचतील व प्रकल्प हि पूर्ण होतील , असा पर्याय भाजप नेते किरण दादा ठाकरे यांनी आज रविवार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडला.
अमेरिका – चीन – चायना देशात त्यांनी याच प्रक्रियेचा वापर करून विकासाची क्रांती घडविली असल्याने , आपल्या देशात – राज्यात देखील अशीच झाडे पुनः रोपण करून विकासाची क्रांती घडवू शकतो , ज्याने प्रकल्प पूर्ण होऊ शकतात .
आज टोरेंट वीज प्रकल्प हा हरित , प्रदूषण विरहित प्रकल्प असून वीज देशाची – राज्याची गरज असून येथे ३ हजार मेगावॅट इतकी वीज निर्मिती होणार असून अश्या प्रकल्पाला आमचा ” विरोध ” नसून किरण दादा ठाकरे यांनी यावर वरील पर्याय निवडण्याची मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे केली.




