टॉप न्यूज़

……” कर्जतमध्ये आधार केंद्रात नवविवाहित मुली नाव बदलीच्या प्रतिक्षेत “……

आधार कार्ड वरील नाव चेंज करण्यासाठी ” नवीन फॉरमॅट ” कॉम्प्युटरवर सबमिट न झाल्याने अनेक कामे बंद …….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

जुन्या कर्जत नगर परिषद कार्यालयात असलेल्या ” आधार केंद्रात ” अनेक नवविवाहित मुलींचे नाव बदली करण्याचे काम कॉम्प्युटरमध्ये ” नवीन फॉरमॅट ” बरेच दिवस झाले सबमिट झाले नसल्याने आपले नाव कधी बदली होणार ? या प्रतीक्षेत असून नाव चेंज होण्या अभावी त्यांची पुढील शासकीय कामे रखडली आहेत , त्यामुळे शासनाच्या या ” बेजबाबदार ” कामाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

           शासकीय कामात आधार कार्ड हे खूपच महत्वाचे असते. आधार कार्ड वरील नाव बदली करण्याकामी नवविवाहित मुली , उपजिल्हा रुग्णालयातून किंवा ग्रामीण भाग असेल तर ग्रामपंचायतीतून ” मॅरेज सर्टिफिकीटस ” किंवा गॅझेट प्रमाणपत्र त्यांना आणावे लागते. मात्र मॅरेज सर्टिफिकीटस किंवा गॅझेट प्रमाणपत्र सबमिट केल्यावर त्याबरोबर आता नवीन फॉरमॅट शासनाकडून आले आहे , त्यात एफिडेविट असल्याचे आधार केंद्रावरील कर्मचारी सांगत आहेत.

          हे फॉरमॅट कर्जत मधील प्रशासकीय भवन , नवीन नगर परिषद समोर , जुन्या नगर परिषद इमारतीत अश्या कुठल्याच आधार केंद्रात अजून वरिष्ठ कार्यालयाकडून सबमिट झाले नसल्याने नवविवाहित मुलींना सासरकडचे नाव लागून बदली झाले नसल्याने बँकेची कामे , शासकीय योजनांचा लाभ घेता येत नसल्याने शासनाच्या बेजबाबदार कामाबद्दल संतापाचे वातावरण तयार झाले आहे. 

        तरी त्वरित आधार कार्ड वरील नाव बदलीसाठी आधार केंद्रातील कर्मचारी वर्गाने ” नवीन फॉरमॅट ” मागवून नवविवाहित मुलींची ” प्रतिक्षा ” संपवावी , अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!