टॉप न्यूज़

……” मुख्य बाजारपेठ व महावीर पेठ येथील 630 KVA क्षमतेच्या नवीन ट्रान्सफॉर्मरचा लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते “……

शुक्रवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी नगरसेवक ” ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल ” यांचे आग्रहाचे निमंत्रण ! 

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जतकर नागरिकांच्या समस्या नेहमीच सुनियोजित आराखडा करून सोडविण्यात ” हातखंडा ” असलेले कर्जत नगर परिषदेचे शिवसेनेचे नगरसेवक ” ॲड. रोहित ओसवाल ” यांनी यावेळी नागरिकांची व व्यापारी वर्गाची एक महत्त्वपूर्ण समस्या सोडवून ” वाहव्वा ” मिळवली आहे. कर्जत नगर परिषद हद्दीतील शहरातील ” मुख्य बाजारपेठ व महावीर पेठ ” परिसरातील नागरिक आणि व्यापारी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर येथील शिवसेनेचे नगरसेवक ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल यांनी सातत्याने पाठपुरावा करून अखेर यावर आता अंतिम तोडगा निघाला आहे. सदर ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊन बसविण्याचे काम पूर्ण झाले असून 630 kva क्षमतेचा हा ट्रान्सफॉर्मर असल्याने या प्रभागात आता विजेच्या समस्या संपल्या आहेत.

            विजेच्या या समस्येचे निराकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून 630 KVA क्षमतेच्या नवीन ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता, श्री शनी मंदिर – कर्जत येथे आयोजित करण्यात आले आहे.

          या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री. ” महेंद्र शेठ थोरवे व गटनेते ॲड. संकेतजी भासे ” यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे परिसरातील वीजपुरवठ्याची समस्या दूर होण्यास मदत होणार असून, नागरिक व व्यापारी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

           तरी या महत्त्वपूर्ण लोकार्पण सोहळ्यास आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी विनंती व आग्रहाचे निमंत्रण ॲड. रोहित राजेंद्र ओसवाल – नगरसेवक , कर्जत , तसेच रोहित बाफना , आशिष वर्मा , विनायक गायकवाड , विक्रम ओसवाल , अश्विन जैन सहित व्यापारी वर्ग , नागरिक , व शिवसैनिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!