…..” कर्जतमध्ये भारतीय बौद्ध महासभा व जेष्ठ नागरिकांच्या वतीने ” धम्म चक्र प्रवर्तन दिन ” उत्साहात साजरा “……

अनेकांनी ” विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांच्या पवित्र विचारांना केले अभिवादन !
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
तथागत भगवान ” गौतम बुद्ध ” यांच्या महापरिनिर्वान नंतर स्थिरावलेले ” धम्म चक्र ” सम्राट अशोका यांनी पुन्हा परिवर्तित करून कलिंग युद्धाच्या दहाव्या दिवशी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली अश्या ” सम्राट अशोका विजया दशमीच्या ” व अडीच हजार वर्षानंतर ” थोर महापुरुष डॉ . बाबासाहेब आंबेडकर ” यांनी याच दिवशी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी ” रक्ताचा एक ही थेंब न सांडवता नागपूर येथे बुद्ध धम्माची लाखो अनुयायी सोबत दिक्षा घेवून स्थिरावलेले ” धम्म चक्र ” पुन्हा एकदा परिवर्तित करून बुध्द धम्म तुम्हा – आम्हा सर्वांना दिला , व धम्म क्रांती घडविली. असा हा ” सम्राट अशोका विजया दशमी व धम्म चक्र प्रवर्तन दिन ” कर्जत मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे आज मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी भारतीय बौद्ध महासभा व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने अभिवादन व सूत्रपठण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा कर्जत तालुका अध्यक्ष आयु. बी.एच. गायकवाड , प्रकाश गायकवाड – ता. अध्यक्ष , उल्हास जाधव – कर्जत ता. संस्कार उपाध्यक्ष , गुलाब शिंदे – जेष्ठ नागरिक , संकेत चव्हाण , रमेश खैरे , धनाजी जाधव , गणेश जाधव , उत्तम गायकवाड , धाऊ फाळे, भिमराव गायकवाड , सूर्यवंशी साहेब , भीमराव रोकडे , नंदागवळी सर , बागुल सर , जाधव सर , नितीन यादव , आदी पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्याचप्रमाणे अनेक बौध्द बांधव व बहुजन समाजाने येथे येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना अभिवादन केले.

यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांना व बहुजन समाजाला ” सम्राट अशोका विजया दशमीच्या व धम्म चक्र प्रवर्तन ” दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.





