कर्जत – खालापूर मतदार संघाचे ” भावी राजकीय वारसदार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर भाऊ परशुराम घारे !

प्रगतशील शेतकरी ते राजिप चे ” उपाध्यक्ष ” एक संघर्षमय सुवर्ण राजयोग……..
भिसेगाव- कर्जत / सुभाष सोनावणे –
राजयोग कधी येईल , तर कधी वनवास , हे सांगता येणे शक्य नाही .सुतपुत्र कर्ण राजा झाला तर पांडवाना राजा असुनही वनवासाचे जीवन जगावे लागले .सतयुग गेले , कलयुग आले , तरीही ही परंपरा अजुनही कायमच राहिली .निसर्गाची अगाध महिमाच म्हणावे लागेल . पण तरीही आपल्या चाणाक्ष बुद्धीने वेळेवर मात करत मेहनतीने प्रगतशील शेतकरी असताना आपल्या हातून परिसराबरोबरच तालुक्यातील नागरिकांची व गोरगरीब – गरजू शेतकरी बांधवांची सेवा व्हावी , नागरिकांच्या समस्या आपण लक्ष घालून सोडवू शकू , म्हणूनच प्रथमच बीड जिल्हा परिषद निवडणुकीस सामोरे जाऊन झालेल्या अटीतटीच्या लढतीत सन २०१७ साली राजयोग खेचून आणून विजयी झालेले रायगडचे ” भीष्मांचार्य ” सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी तर कर्जत – खालापूर मतदार संघात ” ज्यांनी कमी वयात रायगड जिल्हा परिषदेचे ” उपाध्यक्ष ” पद बघुन आपल्या कार्यकुशलतेने विकासाची गंगा मतदार संघात आणून आपल्या कार्याने बहरले , ते तरुणांचे ताईत , अतिशय नम्र , सतत हसतमुख , कर्जत तालुक्यातील सांगवी येथे रहाणारे राजकीय क्षितिजावरील ” चमकणारा तारा ” व भावी ” राजकीय वारसदार ” म्हणून पाहिले जाते असे ” सुधाकरशेठ परशुराम घारे ” . यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो .

कर्जत तालुक्यात वास-याच्या खोंड्यात सांगवी या ग्रामीण भागात रहाणारे सुधाकर घारे हे प्रगतशील शेतकरी कुटुंबातील आहेत . वडील परशुराम ( आप्पा ) घारे हे राजकारणात असूनही सुधाकर घारे हे शेती व्यवसाय , पालेभाज्या , दुग्ध व्यवसाय करत उदयास येत होते . परिसरातील नागरिकांच्या , शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवत असताना खांडपे ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी उडी घेऊन त्यांचे बंधू मधुकर भाऊ घारे यांना निवडून आणले व ग्रामपंचायत ताब्यात घेतली . त्यानंतर त्यांच्या पत्नी सौ . नमिता सुधाकर घारे – मा. सरपंच खांडपे ग्रामपंचायत , असे सातत्याने सरपंच पद त्यांच्या घरात राहिले आहे. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील इंग्रजीतून शिक्षण घेऊन आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात ” गरुड भरारी ” घ्यावी , हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात ” झेप ” घेतली व खांडपे येथे अत्याधुनिक शिक्षण असलेली शाळा उदयास आणली . आज कर्जत तालुक्यातील नावारूपास आलेली त्यांच्या स्वर्गीय पत्नी यांच्या नावाने ” गीता फाउंडेशन ” ची निर्मिती केली .
आपल्या परिसरातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली .याच त्यांच्या स्वभावाने ते ” तरुणांच्या गळ्यातील ” ताईत बनले . त्यांच्या वाढत्या कार्यकुशल प्रसिद्धीचा आलेख पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवक कर्जत तालुका अध्यक्ष पद देऊन पक्ष विस्तार व मजबूत केला . त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत बीड जिल्हा परिषद मतदार संघातून त्यांना संधी दिली व ते प्रचंड मताने निवडून आले व त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगडचे सर्वेसर्वा खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा शिक्षण – आरोग्य – क्रीडा विभागाचे सभापती करून आपल्या तालुक्यातील ” विकासाचा महामेरू ” केले .कोरोना संसर्ग महामारीत त्यांची नागरिकांना केलेली मदत त्यातून त्यांची दिसणारी ” तळमळ ” तर ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी टँकरने दिलेले पाणी , खोदलेल्या बोअरवेल हे न विसरणारे कार्य सर्वांच्याच स्मरणात राहील . याच जोरावर परिवर्तन विकास आघाडीचे माध्यमातून त्यांनी कर्जत नगर परिषद तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भरभरून यश देऊन मतदारांनी त्यांना पसंती दिली आहे. म्हणूनच कर्जत पंचायत समितीवर त्यांच्या पत्नी ” सौ. नमिता सुधाकर घारे ” या सभापती म्हणून विराजमान आहेत.
तरुणांना मातीच्या खेळातील आवड निर्माण करण्यासाठी कबड्डी , क्रिकेट खेळायला प्राधान्य देवून ते दरवर्षी भरघोस बक्षिसे लावून सामने भरवून सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतात , तरुणांना स्वताच्या पायावर उभे रहाणे साठी ” रोजगार मेळावे भरवितात , महिलांच्या उन्नतीसाठी व स्वयंरोजगारासाठी महिला बचत गटांना स्फूर्तिदायक मेळावे भरवतात , बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून येथील पारंपारिक खेळ भरवून नागरिकांचा आनंद द्विगुणित करतात , माहेरवाशीण भगिनिंसाठी ” मंगळागौर स्पर्धा ” आयोजित करून भावाचे नाते जपतात , आपल्याला घडविणाऱ्या ” शिक्षक रुपी गुरुवर्य ” यांना मानसन्मान देतात , अश्या विविध कार्यक्रम व उपक्रमाच्या माध्यमातून जन माणसात सलोखा निर्माण करत आहेत. नुकतेच त्यांचे तरुणांना रोजगार देण्यासाठी केलेला ” महाएल्गार ” चा संघर्ष सर्वांनी पाहिला आहे.
भविष्यात अजूनही त्यांच्या मनगटाच्या ताकदीच्या जोरावर व राजयोगाच्या सामर्थ्याने उत्तरोत्तर विकास कार्य करून कर्जत खालापूर मतदार संघाचे ” राजकीय वारसदार ” बनण्यासाठी त्या साजेसे मुसंडी ते मारत आहेत . रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हि त्यांची केलेली निवड त्यांच्या कार्याला साजेसे पद आहे . मागील काळात विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा थोड्याफार मताने पराभव झाला असला तरी ते न डगमगता पुन्हा जोशाने काम करत आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत – खालापूर विधानसभा मतदार संघाचे ” राजकीय वारसदार ” म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने त्यांचे पुढील राजयोग सुवर्ण काळात होवो , हीच त्यांच्या ” १७ ऑक्टोबर २०२६ ” या त्यांच्या जन्मदिनी या मतदार संघातील नागरिक , मतदार राजा त्यांना भविष्यासाठी मनासारखे होवो , व त्यांच्या ईच्छा – आकांक्षा पूर्ण होवो , हिच ईश्वरचरणी प्रार्थना , व अशी मनोकामना करताना दिसत आहेत .
शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता त्यांचा वाढदिवस ” अभिष्टचिंतन सोहळा ” खांडपे – रेडिसन ब्लू येथे आयोजित केला असून या सोहळ्यास राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे उपस्थित राहून आशीर्वाद देणार असल्याने सर्वांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.




