…….” शिवभक्त नदीम भाई खान बाप्पाच्या चरणी नतमस्तक “……
कर्जतमध्ये सर्व प्रभागात दर्शन घेत मानाचा " सागमं " च्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन केली सांगता !

आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या घरच्या ” बाप्पाचे ” हि घेतले दर्शन…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
सर्व धर्म एकच मानून , सर्वधर्म समभावाची भावना उराशी बाळगून ” शिवसेना ” च माझी जात , माझा धर्म अशी बालपणापासूनच खुणगाठ बांधून , श्री बाप्पाचे चरणी तरुण वयात आल्यावर ” हर घर दर्शन ” घेत बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व काही मिळाले , असे प्रसन्न मुद्रेत सर्वांना सांगणारे ” शिवभक्त नदीम भाई खान ” यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील कर्जत नगर परिषद हद्दीतील सर्व प्रभागात जाऊन आपल्या मित्र परिवाराकडे बाप्पाचे दर्शन घेतले.

तर कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या निवासस्थानी देखील श्री गणेशाचे दर्शन घेऊन कर्जत शहरातील श्री कपालेश्वर मंदिरातील ” सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ” मानाच्या गणपती बाप्पाला पुष्पहार अर्पण करून मनोभावे पाया पडून दर्शन घेत सांगता केली.

शिवसेना कर्जत शहर संघटक ” नदीम भाई खान ” दरवर्षी बाप्पाचे पूजन – दर्शन मनोभावे घेतात. लहान वयात त्यांना बाप्पा बद्दल खूपच प्रेम – आस्था असून आपल्या साई नगर प्रभागात ते दरवर्षी पाच दिवस ” माघी गणेशोत्सव ” मोठ्या उत्साहात कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करतात. प्रत्येक सण उत्सव व महापुरुषांच्या जयंती, ईद , साजरी करताना इतर धर्मियांच्या उत्सवात देखील त्यांची हजेरी असते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – कर्जत यावेळी ” ९० ” व्या वर्षात पदार्पण केले असल्याने अनेक कार्यक्रमाने गणेशोत्सव साजरा झाला. यावेळी नदीम भाई खान यांनी सर्व कार्यक्रमात हजेरी लावली , तर स्थानिक गायकांच्या ” कराओके ” कार्यक्रमात भाग घेऊन नदीम भाई यांनी सुंदर गीत सादर केले. तर अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जनात देखील त्यांनी उपस्थित राहून पुष्पहार अर्पण करून बाप्पाचे दर्शन घेतले.

आपले राजकीय गुरू आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांच्या निवासस्थानी देखील जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या समवेत पालकमंत्री मान. भरतशेठ गोगावले यांचे आशीर्वाद घेऊन मा. उपसभापती मनोहर दादा थोरवे , विश्वनाथ थोरवे यांची भेट घेतली. तर कर्जत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावर्षी देखील ” बाप्पाच्या ” चरणी नतमस्तक होत दर्शन घेऊन सर्वांना सुखी ठेव व राजकीय क्षेत्रात ” चमकदार ” कामगिरी व्हावी , अशी बाप्पाकडे प्रार्थना शिवभक्त ” नदीम भाई युसुफ खान ” यांनी केली.




