टॉप न्यूज़

……” मदतीचा हात – संकटात साथ , नगरसेवक ” ॲड. संकेत दादा भासे ” यांच्या हस्ते दहिवली संजय नगर वाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप “……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

कर्जत नगर परिषद हद्दीत रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी ढगफुटीच्या मुसळधार पावसामुळे दहिवली संजय नगर वाडी येथे अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या कठीण प्रसंगी नुकसानग्रस्त नागरिकांच्या दुःखात सहभागी होत, त्यांच्या गरजा जाणून घेऊन नेहमीच दहिवली नागरिकांच्या सोबत राहून ” मदतीचा हात – संकटात साथ “, देत नगरसेवक ॲड. संकेत दादा जनार्दन भासे यांच्या व उपस्थित नगरसेवकांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

            संकट कितीही मोठे असले तरी आपण एकटे नाही, आपल्या सोबत माणुसकी आणि मदतीचे हात आहेत, हा विश्वास या माध्यमातून नागरिकांना देण्याचा प्रयत्न कर्जत नगर परिषदेचे गटनेते ॲड संकेत दादा भासे यांच्या मार्फत करण्यात आला.

          यावेळी नगरसेविका सौ. जान्हवी देवघरे, नगरसेवक वैभव सुरावकर, युवासेना शहर अधिकारी सचिन भोईर, उपशहरप्रमुख दिनेश कडू, शिवसेना शहर संपर्कप्रमुख सुदेश देवघरे, गणेश लाड, अजय दिघे, संजय दिघे, संकेत जाधव, स्वप्निल जाधव तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

         ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर प्रशासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नगरसेवक ॲड. संकेत दादा भासे यांनी नागरिकांना या भावनिक प्रसंगी आश्वासन दिले. त्यांच्या या संकटाच्या काळात नागरिकांच्या सोबत उभे राहून केलेल्या मदतीतून ” हीच खरी लोकसेवा ” , हेच दिसून येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!