दिल्ली NCR

……” भाजप नेते सुनील गोगटे यांचा ” पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या ” ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी लढा व पाठपुरावा सुरूच “…….

पेण अर्बन बँकेच्या ” त्रस्त ” ठेवीदारांना आपल्या हक्काचे पैसे परत मिळण्याबाबत नवी ” आशा “…….

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

रायगड सहित कर्जत तालुक्यातील नागरिकांच्या ” जिव्हाळ्याच्या ” असलेल्या ” पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या ” अडचणीत सापडलेल्या असंख्य ठेवीदारांचे किमान ₹५ लाखांपर्यंतचे पैसे परत मिळावेत, यासाठी भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेश सचिव व कर्जत तालुक्यातील नेते ” सुनील गोगटे ” हे सातत्याने विविध स्तरांवर पाठपुरावा करत असताना आता पुन्हा एकदा त्यांनी हा ” लढा व पाठपुरावा ” सुरू केला आहे.

            जे ठेवीदारांनी आपल्या आयुष्यभराची मेहनत आणि कष्टाने कमावलेला पैसा पेण बँकेत विश्वासाने ठेवला होता , त्यामुळे या त्रस्त ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे लवकरात लवकर परत मिळणे, हीच त्यांची प्रमुख भूमिका आहे.

             या विषयासंदर्भात सुनील गोगटे यांनी ” केंद्रीय अर्थ मंत्रालय तसेच केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे ” वारंवार पाठपुरावा केला आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते मान. खासदार डॉ. अनिलजी बोंडे साहेब आणि मान. विनोदजी तावडे साहेब यांची भेट घेऊन या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सहकार मंत्रालय आणि वित्त मंत्रालय यांची बैठक आयोजित करून ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली आहे. 

 

           या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. अनिलजी बोंडे साहेबांनी केंद्रीय सहकार मंत्री मान. अमितभाई शाह साहेब तसेच केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर मोहोळ साहेब यांच्याकडे या विषयात तातडीने लक्ष घालून मार्ग काढण्याची विनंती केली आहे . तर मान. मुरलीधर मोहोळ साहेबांनी पुढील कार्यवाहीसाठी वित्त मंत्रालयाला आवश्यक मार्गदर्शन करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

               या सकारात्मक हालचालींमुळे ” पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या ” त्रस्त ठेवीदारांना आपल्या हक्काचे पैसे परत मिळण्याबाबत नवी ” आशा ” निर्माण झाली आहे.

           कर्जत तालुक्यातील या ठेवीदारांशी व शेतकरी बांधवांशी भाजप नेते सुनील गोगटे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत , हा प्रश्न केवळ पैशांचा नाही, तर ठेवीदारांच्या विश्वासाचा आणि त्यांच्या हक्काचा आहे. ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत हा पाठपुरावा व लढा थांबणार नाही. लवकरात लवकर ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत , यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू , असे भावनिक मत , सुनील सदाशिव गोगटे महाराष्ट्र प्रदेश सचिव, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!