दिल्ली NCR

…..” टाटा – गोदरेज कंपनीमध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विरोधातील पुरावे सादर करा , नाहीतर हि भंपकबाजी बंद करा , अभिषेक सुर्वे यांचा तटकरे – घारे यांना ईशारा “……

कंपनीमध्ये कोठाच नाही तर " भरती " होणार कशी ? तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करु नका !

हा तर ठरवून केलेला ” महाएल्गार ” चा फ्लॉप शो ! कर्जत शहर प्रमुख ” अभिषेक सुर्वे ” यांचा गौप्यस्फोट……..

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –

ठरवून केलेला ” महाएल्गारचा ” ॲक्टिंग शो अखेर ” फ्लॉप शो ” झाला असल्याचा गौप्यस्फोट करत शिवसेना कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी कंपनीमध्ये कोठाच नाही तर ” भरती ” होणार कशी ? तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करु नका , तर टाटा – गोदरेज कंपनीमध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विरोधातील पुरावे सादर करा , नाहीतर हि ” भंपकबाजी ” बंद करा , असा शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी ” तटकरे – घारे ” यांना संतप्त ईशारा आज बाळासाहेब भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.

           स्वयंघोषित ” कोकणचे भाग्यविधाते ” म्हणणारे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी १५ दिवस या मतदार संघात असंतोष माजवत तरुणाईला वेठीस धरण्याचे काम केले , मग त्यांनी त्याचवेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अगोदरच आपली भूमिका फोन करून का सांगितली नाही ? की कॉल करूनही मान. मुख्यमंत्री यांनी त्यांचा कॉल उचलला नाही का ? अशी खिल्ली अभिषेक सुर्वे यांनी उडवली.

        या जिल्ह्याचे १० वर्षे पालकमंत्री तुम्ही होता , अडीच वर्षे तुमची मुलगी पालकमंत्री होत्या , साडेबारा वर्षे झाली तुम्ही रायगडचे खासदार आहात , या जिल्ह्याचे पालकत्व तुमच्याकडे असताना तेंव्हा तुम्हाला तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न दिसला नाही का ? असा सवाल यानिमित्ताने खासदार सुनील तटकरे यांना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी विचारला. तुमच्या रोहा माणगाव मतदार संघात सोईचे राजकारण तर येथे वेगळे राजकारण करु नका , येथील शिवसैनिक ते सहन करणार नाहीत , असा सल्ला देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत दिला. 

        आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन सांगितले होते की , होणाऱ्या बैठकीस मान. पालकमंत्री भरतशेठ गोगावले , स्थानिक आमदार म्हणून मी असे बैठकीला आमंत्रित करा , मात्र असे असतानाही झालेल्या बैठकीत फक्त खासदार सुनील तटकरे – जिल्हाधिकारी – सुधाकर घारे हेच होते , इतर कुणी नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला. येथील नेतृत्व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावर बिनबुडाचे आरोप कराल , तर येथील जनता , शिवसैनिक ते सहन करणार नाहीत , जशास तसे उत्तर देऊ , असा इशारा शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी तटकरे – घारे यांना दिला. 

        कंपनी व्यवस्थापन नियमांची पायमल्ली करून त्यांना वेठीस धरले , तर आहेत त्या कंपनी सुद्धा बंद होतील , अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. व इतर नवीन कंपन्या इथे सुरू होणार नाहीत , यास आपण दोघे जबाबदार असाल , असा इशारा देखील अभिषेक सुर्वे यांनी तटकरे – घारे यांना दिला. आमदार महेंद्र शेठ थोरवे हे स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काल ही प्रयत्नशील होते व आज ही आहेत , आणि उद्या ही रहाणार , असे त्यांनी ठाम मत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!