टॉप न्यूज़

…..” चुकीच्या पद्धतीने बॅनरबाजी व दिशाभूल करण्याचे काम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे या मतदार संघात करत आहे – ॲड संकेत दादा भासे “……

" बालिश " माणसांच्या नादी लागून प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे आपली " राजकीय प्रतिमा " मलिन करत आहेत !

विरोधी पक्षनेते ” ॲड संकेत दादा भासे ” यांची पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यावर शाब्दिक चपराक……

भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे – 

” महाएल्गार ” च्या नावाखाली तरुण बेरोजगारांची माथी भडकविण्याचे व त्यांची दिशाभूल करण्याचे काम कर्जत खालापूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ” सुधाकर घारे ” हे करत असून त्यांच्या या बालिश वागणुकीचे समर्थन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष ” सुनील तटकरे ” हे करत असून आपली ” राजकीय प्रतिमा ” मलिन करत असल्याचा सल्ला शिवसेनेचे युवा नेते तथा कर्जत नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते ” ॲड संकेत दादा भासे ” यांनी आज रविवार दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी बाळासाहेब भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

         यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांनी प्रथम आपल्या रहात असलेल्या भागात ” रेडिसन ब्लू ” या पंचतारांकित हॉटेल मध्ये काम करत असलेल्या तरुणांचा मुद्दा उपस्थित करत कित्ती जणांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी काम दिले , कित्ती स्थानिक तरुण आहेत ? व त्यांना ७ ते ८ हजारात कसे राबवून घेतले जाते ? हा मुद्दा उपस्थित करत पहिले सुरुवात तेथून करा व मग खालापूर मध्ये डोकवायला जावे , अशी चपराक मारली.

           मध्यंतरी ज्या विद्यार्थिनींनी रस्त्याची क्लिप प्रसिद्ध केली , ती विद्यार्थिनी हि त्यांच्याच घरातील आत्माराम घारे यांची मुलगी असून हा रस्ता अंतर्गत रस्ता आहे . यांच्याच काळात यांची पत्नी त्यावेळी सरपंच असताना व आता पंचायत समितीच्या सभापती सौ. नमिता सुधाकर घारे असताना तो रस्ता सुधारावा अशी यांची नैतिक जबाबदारी नाही का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला. या खांडपे कोंदिवडे रस्त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी या मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिला असल्याचा दावा यानिमित्ताने विरोधी पक्षनेते ॲड संकेत दादा भासे यांनी व्यक्त केला. तर उड्डाण पुलाच्या बाबतीत देखील सुधाकर घारे चुकीची बॅनरबाजी करून दिशाभूल करत असल्याचे सांगितले.

          टाटा – गोदरेज कंपनीत आमचे कुठलेही ठेके नाहीत , मात्र कुठे काही झाले की , आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे नाव घ्यायचे आणि यांच्या भाच्याचे , पुतण्याचे नाव घेऊन आरोप करून दिशाभूल करण्याचे राजकारण करायचे , अशी सुधाकर घारे यांची ” स्टंटबाजी ” करण्याची चुकीची पद्धत असल्याचे नगरसेवक ॲड संकेत दादा भासे यांनी प्रकाश टाकला. आणि म्हणूनच यांचा ” महाएल्गार ” रोड शो प्रशासनाने मोडीत काढल्याचे सत्य त्यांनी या पत्रकार परिषदेत मांडले. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खालापूरचे नेते रोहित विचारे , युवा जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे , कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , व अनेक शिवसैनिक उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!